Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कॉफी प्या, पोटावरची चरबी कमी करा! वेटलॉस कॉफी नावाचा नवा ट्रेंड

कॉफी प्या, पोटावरची चरबी कमी करा! वेटलॉस कॉफी नावाचा नवा ट्रेंड

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. त्यासाठी दालचिनी, जायफळ, खोबर्‍याचं तेल या तीन गोष्टींची आवश्यकता असते. ही सामग्री घालून तयार होणारी ही वेटलॉस कॉफी वजनावर असरदार परिणाम करते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 06:16 PM2021-07-14T18:16:29+5:302021-07-14T18:20:05+5:30

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. त्यासाठी दालचिनी, जायफळ, खोबर्‍याचं तेल या तीन गोष्टींची आवश्यकता असते. ही सामग्री घालून तयार होणारी ही वेटलॉस कॉफी वजनावर असरदार परिणाम करते.

Drink coffee, reduce belly fat! A new trend called weightless coffee | कॉफी प्या, पोटावरची चरबी कमी करा! वेटलॉस कॉफी नावाचा नवा ट्रेंड

कॉफी प्या, पोटावरची चरबी कमी करा! वेटलॉस कॉफी नावाचा नवा ट्रेंड

Highlightsकॉफीमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण खूप असतं.जायफळ, दालचिनी आणि खोबर्‍यचं तेल टाकलं तर ही कॉफी वजन कमी करण्याचं आणि वजन नियंत्रित करण्याचं काम करते.वेटलॉस कॉफी ही व्यायाम करण्याआधी घ्यावी.

एखादा विशेष क्षण साजरा करण्यासाठी, खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी, पोटभर गप्पा मारण्यासाठी हातात कॉफीचा मग हवाच. अशी ही उत्सवी स्वरुपाची कॉफी वजन घटवण्यासाठी उपाय म्हणूनही काम करते.
बैठं काम वाढल्यानं पोटावरची चरबी वाढण्याची समस्या अनेकांना जाणवते आहे. ही चरबी कमी करण्यासाठी कॉफी पिणं हा पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण दूध घातलेली कॉफी नाही तर ब्लॅक कॉफीनं पोटावरची चरबी कमी होते.
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. त्यासाठी दालचिनी, जायफळ, खोबर्‍याचं तेल या तीन गोष्टींची आवश्यकता असते. ही सामग्री घालून तयार होणारी ही वेटलॉस कॉफी वजनावर असरदार परिणाम करते.

वेटलॉस कॉफीत विशेष ते काय?

कॉफीमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण खूप असतं. त्यात जर जायफळ, दालचिनी आणि खोबर्‍यचं तेल टाकलं तर ही कॉफी वजन कमी करण्याचं आणि वजन नियंत्रित करण्याचं काम करते. कारण जायफळात तंतूमय घटक जास्त असतात ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो आणि त्याने भूकही नियंत्रित राहाते. दालचिनीमुळे चयापचय प्रक्रिया वाढवणारे हार्मोन्स वाढतात. चयापचय क्रिया सुधारली की वजन कमी होतं.

कशी कराल वेटलॉस कॉफी?

 आधी एक कपभर पाणी उकळावं. पाण्याला उकळी आली की त्यात एक छोटा चमचा कॉफी पावडर , एक चमचा जायफळ पूड, एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा खोबर्‍याचं ( खाण्यासाठी वापरलं जाणारं) तेल घालावं. नंतर हे पाणी गाळून घेतलं की वेट लॉस कॉफी तयार होते.
वेटलॉस कॉफी ही व्यायाम करण्याआधी घ्यावी. ती काही दिवस नियमित घेतल्यास आणि सोबत व्यायाम केल्यास त्याचा परिणाम पोटाची चरबी आणि वजन कमी होण्यावर दिसतो.

Web Title: Drink coffee, reduce belly fat! A new trend called weightless coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.