Join us  

नाश्त्याला सूप प्यावं की ज्यूस? आहारतज्ज्ञ सांगतात 10 गोष्टी महत्त्वाच्या, त्या पाहा मग ठरवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2022 6:19 PM

आरोग्यासाठी सूप चांगलं की ज्यूस, सकाळी नाश्त्याला सूप पिणं योग्य की ज्यूस पिणं? आहारतज्ज्ञ म्हणतात, या प्रश्नांचं हेच की तेच उत्तर शोधताना 10 गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्या कोणत्या?

ठळक मुद्देसकाळच्या नाश्त्याला रेडी टु कूक या प्रकारचं सूप पिणं अयोग्य.नाश्त्याला ज्यूस पिणार असाल तर घरी तयार केलेल्या फळांचा ज्यूस हवा!बैठं काम असल्यास सकाळी फायबरयुक्त भाज्यांचं सूप पिणं योग्य

काही गोष्टींबद्दल आपण खूपच पूर्वग्रह बाळगतो. जसे सूप जे रात्रीच्या जेवणातच हवं, ज्यूस हे सकाळी नाश्त्यासोबत प्यावं... पण असे गृहितकं चुकीचे आहे. आपण सकाळच्या नाश्त्याला सूप पिऊ शकतो तसेच एखाद्या पचनास हलक्या पदार्थाबरोबर फळांचा ज्यूस घेऊ शकतो. पण सकाळी सूप पिणं चूक आणि ज्यूस पिणं बरोबर असं टोकाचं सांगू शकत नाही. तसेच आता आरोग्यासाठी सूप चांगलं  की  ज्यूस असा प्रश्न विचारला जातो.  या प्रश्नाचं हेच किंवा तेच असं उत्तर नाही. तुम्ही नाश्त्याला काय खात आहात? दुपारी जेवणाला काय? तुम्ही काम कोणतं करता यासर्वांचा विचार करुन आहार तज्ज्ञ सकाळी नाश्त्याला सूप चांगलं की ज्यूस याचं उत्तर देऊ शकतात. 

Image: Google

सूप् की ज्यूस?

1. सकाळच्या नाश्त्याला सूप घेणं ही चांगली बाब आहे अस्ं आहार तज्ज्ञ म्हणतात. पण सकाळच्या नाश्त्याला आपण कोणतं सूप घेणार हे महत्त्वाचं. रेडी टू कूक असे सूप पिणं टाळावं. तसेच मनचाऊ सारखे  सूपही घेऊ नये.

2. आहारतज्ज्ञ म्हणतात,  मक्याच्या दाण्यांचं सूप, मिश्र भाज्यांचं सूप पिणं उत्तम . यामुळे पाण्यासोबतच पोटात पौष्टिक भाज्याही जातात. शरीराला ऊर्जा मिळते. तसेच  तास न तास बसून काम असल्यास पचनास योग्य असं फायबर युक्त भाज्यांचं सूप पिणं उत्तम पर्याय आहे.

3. दुपारी वेळेत आणि पोटभर जेवणार असू तरच सकाळी नाश्त्याला सूप घेणं योग्य ठरतं. कारण सूपमुळे पोट जसं भरतं तसेच सूप पिल्याने भूक जास्तही लागते. भूक भागेल , जेवण वेळेत होईल याची खात्री असेल तरच सकाळी नाश्त्याला सूप घ्यावं.

Image: Google

4.  नाश्त्याला ज्यूस पिणं हे चुकीचं नाही आणि एकदम बरोबरही नाही. नाश्त्याला नुसतं ज्यूस पिऊ नये. पोहे, उपमा, सॅण्डविच,  एखादं धिरडं असा हलका नाश्ता केलेला असल्यास सोबत फळांचा थोडा ज्यूस पिणं योग्य ठरतं. यामुळे पोट भरतं आणि शरीरास हवा असलेला उत्साह मिळतो. 

5. ज्यूस घेतांना बाहेरचे साखरयुक्त पेयं पिऊ नये. डाळिंबं/ मोसंबी/ संत्री/ अननस या फळांचं घरी केलेलं ज्यूस योग्य ठरतं. ज्यूस करताना त्यात साखर घालू नये. फळांच्या रसात साखर घालून पिणं वजन वाढीस कारणीभूत ठरतं. 

6. फळांचं ज्यूस प्यायचं असेल तर सोबत नाश्त्याचा पदार्थ हलका फुलका हवा. कारण फळांचा रसही पचायला जड असतो. 

7. सकाळी कामाची घाई असल्यास पटकन पोट भरणारं भाज्यांचं सूप घेणं योग्य ठरतं. 

Image: Google

8. आहार तज्ज्ञ म्हणतात की सूप की ज्यूस असाच निवाडा करायचा असल्यास भाज्यांचं फायबरयुक्त सूप पिणं हे उत्तम.

9. उन्हाळ्याच्या काळात लवकर थकवा येतो. काम करताना गळपटल्यासारखं होतं तेव्हा हलक्या फुलक्या नाश्त्यासह घरी तयार केलेलं फळांचं ज्यूस योग्य ठरतं. 

10. दिवसभर जर थकवणारं काम असेल तर सकाळी नाश्त्यासोबत फळांचा ज्यूस घ्यावा. संध्याकाळी जेवणा अगोदर वाटीभर सूप प्यावं. यामुळे सकाळी कामाच्या वेळेस ऊर्जा मिळते आणि रात्री कामामुळे झालेल्या कष्टांवर सूप पिल्याने आराम मिळतो 

टॅग्स :आहार योजनाहेल्थ टिप्सआरोग्यअन्नफळे