Fat Loss Japanese Drink : जपानी लोकांची लाइफस्टाईल, त्यांचं निरोगी राहणं आणि जास्त काळ जगणं या गोष्टी नेहमीच चर्चेच्या व उत्सुकतेच्या असतात. या लोकांचं रूटीनचं फार वेगळं असतं. सकाळी झोपेतून उठण्यापासून, खाण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत अनेक गोष्टींचं काटेकोर पालन हे लोक करतात. सोबतच त्यांच्याकडे अशा थेरपी आहेत ज्यांच्या मदतीनं ते नेहमी फिट राहतात. त्यांची अशीच एक थेरपी म्हणजे वॉटर थेरपी. जी त्यांच्या शरीरावर अजिबात चरबी वाढू देत नाही.
जपानमधील लोक आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, चरबी कमी (Fat Loss Drink) करण्यासाठी एक खासप्रकारचं पाणी पितात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी ना जास्त खर्च लागत ना ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत. काही दिवसच हे पाणी प्यायल्यानंतर पोट-पाठीवर वाढलेली चरबी लगेच कमी होताना दिसेल.
काय आहे हे जपानी पाणी?
कुणालाही वाटणं सहाजिक आहे की, जपानी लोकांचं हे खास ड्रिंक म्हणजे खूप काही वेगळं असेल. पण असं अजिबात काही नाहीये. हे ड्रिंक जपानी पारंपारिक ड्रिंक आहे. या पाण्यातील तत्व शरीर आतून साफ ठेवतात आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. या पाण्याची आणखी एक खासियत म्हणजे हे पाणी पचन तंत्र मजबूत ठेवतं. ज्यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचतं, अशात शरीरात फॅट जमा होत नाही. या ड्रिंकनं शरीरातील चरबी कमी करण्यास मदत मिळते.
कधी आणि कसं पितात?
या खास जपानी पाण्याचा फायदा मिळवायचा असेल तर ते कसं आणि कधी प्यावं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. हे ड्रिंक पिण्याची सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे सकाळी उपाशीपोटी आहे. ज्यामुळे रात्रभर स्लो झालेलं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीराचं तापमान संतुलित होतं. हे ड्रिंक एक एक घोट करून आरामात प्यावं. जेणेकरून त्यातील पोषक तत्व शरीरात योग्यपणे अवशोषित व्हावे. हे ड्रिंक तुम्ही दिवसातून दोनदाही पिऊ शकता.
कसं बनवाल हे ड्रिंक?
हे खास चरबी कमी करणारं जपानी ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला केवळ कोमट पाणी, अर्ध लिंबू, काकडीचे काही स्लाइस आणि पदीन्याची पानं लागतील. या सगळ्या गोष्टी पाण्यात मिक्स करून काही वेळासाठी ठेवा आणि नंतर पिऊन टाका. महत्वाची बाब म्हणजे हे ड्रिंक उन्हाळ्यात जास्त फायदेशीर ठरतं.
किती दिवसात दिसेल फरक?
असं काही फिक्स सांगता येत नाही कारण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. तरी सामान्यपणे असं सांगितलं जातं की, रोज जर हे ड्रिंक प्याल तर ७ ते १० दिवसात याचा प्रभाव दिसून येईल. मात्र, आम्ही असा कोणताही दावा करत नाही. कारण केवळ हे ड्रिंक पिऊन चरबी कमी होणार नाही. यासोबतच तुम्हाला रोज संतुलित पौष्टिक आहार घ्यावा लागेल आणि सोबतच नियमितपणे एक्सरसाईजही करावी लागेल. कारण हा एक नॅचरल उपाय आहे एखादी जादू किंवा चमत्कार नाही.