Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...

वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...

What is the best time to drink lemon honey water for weight loss : कोमट पाण्यात मध, लिंबू मिक्स करून प्या आणि वजनात दिसेल फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2024 11:41 PM2024-09-02T23:41:00+5:302024-09-02T23:55:58+5:30

What is the best time to drink lemon honey water for weight loss : कोमट पाण्यात मध, लिंबू मिक्स करून प्या आणि वजनात दिसेल फरक...

Drinking Honey & Lemon Water every morning What is the best time to drink lemon honey water for weight loss | वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...

वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...

सध्याच्या काळात वाढत जाणारे वजन ही एक मोठी समस्या आहे. याचबरोबर वाढणारे वजन कमी करणे हा त्याहून मोठा टास्क आहे. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपायांचा वापर करून पाहतो. वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, एक्सरसाइज असे एक ना अनेक उपाय आपण करत असतो. वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून पिणे हा साधा सोपा उपाय आपण अनेकदा ऐकला आणि आजमावलाही असेल. वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये हा उपाय सर्वात पाहिल्या स्थानांवर असेल. आपल्यापैकी बरेचजण सकाळी उठून रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळून कोमट पाणी पितात(Drinking Honey & Lemon Water every morning).

 कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध घालूंन हे डिटॉक्स वॉटर आपण वजन कमी करण्यासाठी पिऊ शकतो. या डिटॉक्स वॉटरमध्ये कॅलरीज देखील कमी असतात. हे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करण्यासोबतच हे डिटॉक्स वॉटर पिण्याचे आपल्या आरोग्याला इतर अनेक फायदेसुद्धा मिळतात. वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे पाणी नेमके कधी आणि कसे प्यावे, याबद्दल अनेकांना बरीचशी माहिती नसते. यासाठीच आरोग्य डाएट आणि न्यूट्रिशन क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांनी वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे पाणी नेमके कधी आणि कसे प्यावे याबद्दल अधिक माहिती दिली आहे(What is the best time to drink lemon honey water for weight loss).

१. वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी कसे उपयुक्त ठरते ? 

वजन कमी करण्यासाठी अनेक आरोग्य तज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञ लिंबू आणि मधाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. खरंतर, कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त चरबीही जाळण्यास मदत मिळते. लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढतो. यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज जलद गतीने बर्न होतात. जेव्हा चयापचय वाढते आणि कॅलरीज बर्न होतात, तेव्हा ते वजन कमी करण्यास देखील मदत करते. याउलट, जर तुमचे वजन आधीच कमी असेल तर तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी पिणे शक्यतो टाळावे. 

परफेक्ट डाएट-भरपूर व्यायाम करुनही वजन कमी न होण्याचे ‘हे’ मुख्य कारण, मेण्टल हेल्थवरही होतो परिणाम...

२. वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी कधी प्यावे ?

डॉ. सुगीता मुटरेजा सांगतात की, लिंबू आणि मधाचे पाणी तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता. हे पाणी तुम्ही सकाळी, दुपारी किंवा रात्री कधीही घेऊ शकता. पण, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी (Drinking Honey & Lemon Water every morning) लिंबू आणि मधाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास अधिक मदत होते. यासाठी मध शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे असावे, भेसळयुक्त मधाचा वापर करणे टाळावे. 

उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या ५ टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

३. वजन कमी करण्यासाठी लिंबू मध पाणी कसे प्यावे ?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी पिऊ शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर त्यात १ टेबलस्पून  शुद्ध मध घाला. हे पाणी तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही काही महिने दररोज लिंबू आणि मध पाणी पिऊ शकता. योग्य डाएट आणि एक्सरसाइज सोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होते.

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

Web Title: Drinking Honey & Lemon Water every morning What is the best time to drink lemon honey water for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.