Join us  

झोपण्यापुर्वी दूध घेणं सर्वांसाठीच फायदेशीर असतं? कुणी घ्यावं- कुणी टाळावं? तज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या गोष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 2:49 PM

Drinking Milk at Night Before Sleep: रात्री झोपण्यापुर्वी दूध पिणं सगळ्यांसाठीच योग्य असतं का? जर घ्यायचंच असेल तर झोपण्याच्या किती वेळ आधी घ्यावं? वाचा यासगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर...

ठळक मुद्देदूध पिणे आणि झोपणे यामध्ये निश्चितच थोडा गॅप असायला पाहिजे. शिवाय तुमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ आणि दूध घेण्याची वेळ यातही ठराविक अंतर असावे.

अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेक जणांना रात्री झोपण्यापुर्वी दूध पिण्याची सवय असते (Drinking milk at night before sleep). दूध हे एक पुर्णअन्न मानलं जातं. त्यामुळे दूध पिण्याची सवय ही निश्चितच चांगली आहे. पण याबाबतीतही काही पथ्यं पाळणं गरजेचं आहे. जशी प्रत्येक गोष्ट सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही, तसंच रात्री झोपण्यापुर्वी दूध घेणं सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरू शकत नाही. त्यामुळे नेमकं कुणासाठी ते योग्य आहे आणि कुणी ते टाळलेलं बरं, दूध घ्यायचंच असेल तर झोपण्यापुर्वी किती वेळ आधी घ्यावं, यासारख्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांविषयी औरंगाबाद येथील वैद्य पद्मा ताेष्णीवाल (6 important tips shared by Ayurveda expert)यांनी दिलेली ही महत्त्वाची माहिती.

दूध पिऊन झोपण्याची सवय खरोखरंच चांगली आहे का?१. याविषयी वैद्य पद्मा तोष्णीवाल यांनी सांगितलं की दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे रात्री झोपताना दूध पिऊन झोपणे हे आरोग्यासाठी चांगलेच आहे.

साईड फॅट म्हणजेच कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त ३ वेळा करा

दूध पिऊन झोपल्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. पण दूध घेऊन लगेचच झोपण्याची  सवय मात्र चांगली नाही. दूध पिणे आणि झोपणे यामध्ये निश्चितच थोडा गॅप असायला पाहिजे. शिवाय तुमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ आणि दूध घेण्याची वेळ यातही ठराविक अंतर असावे.

 

२. आयुर्वेदानुसार सायंकाळी ७ वाजता जेवण करणे, हे सर्वात उत्तम. तुमचं जेवणंही ७ वाजता होत असेल, तर साधारणपणे रात्री ९ वाजता तुम्ही दूध प्यावे आणि १० वाजता झोपावे. म्हणजेच रात्रीचं जेवण आणि दूध यात २ तासांचं तर दूध आणि झोप यात १ तासाचं अंतर असावं.

अबब.. बघा केवढा मोठ्ठा हा जबडा! तिने तोंड उघडताच झाली चक्क गिनिज बुक मध्ये नाेंद..

३. दूध पचावं म्हणून जे लोक चाळिशीच्या वरचे आहेत त्यांनी झोपण्यापुर्वी गायीचं दूध घ्यावं. म्हशीचं दूध घेत असाल तर दूध आणि पाणी सारख्या प्रमाणात एकत्र करून साखर न घालता प्यावं.

 

४. रात्री दूध घेताना साय काढून उकळून घेतलेलं दूध प्यावं.

५. दूध गरम असावं आणि त्यात चिमुटभर हळद असावी. असं दूध अधिक आरोग्यदायी ठरतं. 

बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली

६. ज्यांना नेहमीच पचनाचा त्रास असतो, वारंवार गॅसेस आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापुर्वी दूध घेणं कटाक्षाने टाळावं.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सघरगुती उपायदूध