जेवताना पाणी पिऊ नये किंवा जेवणाआधी अर्धातास आणि जेवणानंतर अर्धा तास अजिबात पाणी पिऊ नये, असं पाणी आणि जेवण यांच्याबाबत काय काय आपण नेहमीच ऐकत असतो (Drinking water during meal). कुणाचं काही ऐकून तसं करण्याचा प्रयत्नही करतो. पण असं काहीही स्वत:च्या मनाने किंवा ऐकीव माहितीवरून करण्यापेक्षा याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला कधीही चांगला. याविषयी माईंडफूल डाएटच्या आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितलेली ही विशेष माहिती (Drinking Water While Eating).
जेवताना पाणी प्यावे की नाही, याविषयी सांगताना मंजिरी म्हणाल्या की जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा शरीरात अनेक डायजेस्टीव्ह एन्झाईम्स तयार होतात. हे एन्झाईम्स पचन क्रियेसाठी मदत करतात. पण आपण जर जेवणाच्या दरम्यान खूप पाणी प्यायलो तर हे एन्झाईम्स डायल्यूट होतात.
त्यामुळे मग अन्नातून मिळालेली पोषणमुल्ये शरीरात व्यवस्थित शोषली जात नाहीत. काही लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाच्या आधी खूप पाणी पितात. त्यांच्यामते जेवणाआधी खूप पाणी प्यायलं तर जेवण कमी जाईल आणि त्यामुळे वेटलॉस होईल. पण तसं होत नाही. उलट असं केल्याने त्यांच्या शरीरातील डायजेस्टीव्ह हार्मोन्स डायल्यूट होऊन जातात आणि पुरेसं पोषण मिळत नाही.
जेवताना कितपत पाणी पिणं योग्य?
याविषयी सांगताना मंजिरी कुलकर्णी म्हणतात की जेवताना जर तुम्ही अगदी घोट- घोट पाणी पित असाल तर ते उलट पचनाच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. तसेच काही जण जेवण झाल्यानंतर खूप पाणी पितात.
पारदर्शक गुलाबजाम पाहिलाय कधी? बघा, गुलाबजामचा रंग का उडाला, कुणी उडवला? भन्नाट व्हायरल व्हिडिओ
ते मात्र पचनाच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे अजीर्ण होते. जेवण झाल्यानंतरही घोटभरच पाणी प्यावे. त्यानंतर अर्धा तासाने पुरेसे पाणी प्यावे.
मंजिरी कुलकर्णी यांचा याविषयीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/reel/942907633474514