काय खाल्लं म्हणजे वजन कमी होईल? हा प्रश्न कानाला जरा कसातरीच वाटतो ना? काय नाही खाल्लं तर वजन वाढेल ? असा प्रश्न अनेकांना योग्य वाटतो. पण खरंतर पहिलाच प्रश्न योग्य आहे. वजन कमी करताना आरोग्य टिकवणं, शरीराचं पोषण होऊन वजन कमी होणं हे महत्त्वाचं असतं. आहारातून अमूक तमूक वजा केल्यानं वजन कमी तर होत नाहीच पण शरीरात पोषक घटकांची कमतरता तेवढी निर्माण होते.वजन कमी करण्यासोबतच शरीराच्या योग्य पोषणासाठी सुका मेवा उपयुक्त ठरतो. सुका मेवा खावून वजन कमी होणार नाही तर उलट वाढेल असंच अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. पण सुका मेव्याबाबतचा हा समज चुकीचा आहे. सुका मेव्यात पोषक घटक तर असतातच सोबत सुका मेवा खावून भूक देखील नियंत्रणात राहाते. म्हणूनच सुका मेवा आहारात ठेवून वजन कमी करता येतं. सुका मेव्यातले पाच घटक वजन कमी करण्यास उपयोगी ठरतात.
वजन कमी करणारे सुका मेवा
छायाचित्र : गुगल
1. बदाम:- सुका मेव्यात वजन कमी करण्यासाठी बदाम खूप मदत करतात. बदाम खाल्ल्यानं सतत काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह कमी होतो. आठ- दहा बदाम रोज खाल्ल्यास भूक शमते. बदामात उष्मांक कमी आणि पोषक घटक जास्त असतात. बदाम खाल्ल्यानं ओटीपोटावरची चरबी कमी होते तसेच बॉडी मास इंडेक्सही कमी होतो. बदामात मोनो अनसॅच्युरेटेड फॅटस आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे बदाम खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं.
छायाचित्र : गुगल
2. आक्रोड:- वजन घटवण्यासाठी आक्रोड महत्त्वाचे असतात. आक्रोडमध्ये प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. भूक लागल्यावर आक्रोड खाल्ल्यास भूक त्वरित शमते. पोट भरपूर वेळ भरल्यासारखं वाटतं. आक्रोडमधील पोषक घटक मेंदूतील सेरेटोनिन हार्मोनची पातळी वाढवतो. यामुळे भुकेची जाणीव होणं कमी होतं. रोज अक्रोडमधला गर पाण्यात भिजवून नंतर खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
छायाचित्र : गुगल
3. बेदाणे:- भूक लागल्यावर बेदाणे खाल्ले तरी चालतं. बेदाण्यात उष्मांक कमी असतात. एकदा बेदाणे खाल्ले की खूप वेळ काही खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय भूक भागवण्याची क्षमताही बेदाण्यात असते. बेदाणे खाल्ल्यानं शरीरातील मेद कमी होतो शिवाय पोटावरची चरबीही कमी होते.
छायाचित्र : गुगल
4. काजू:- काजू खूप प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढतं. मात्र प्रमाणात काजू खाल्ल्यास वजन कमीही होतं. काजूमधे मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे चयापचयक्रिया सुधारते. काजूत प्रथिनं असतात. या प्रथिनांमुळेही वजन कमी होण्यास मदत होते.
छायाचित्र : गुगल
5. शेंगदाणे:- शेंगदाणे खाल्ल्यानं शरीरातील उष्मांक जळतात. शेंगदाण्यामधे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अँसिडस आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अँसिडस असतात. या घटकांमुळे शरीरावरील सूज कमी होते. शेंगदाणे खाल्ल्यानं शरीराची ताकद वाढते आणि वजनही कमी होतं.