हिवाळा म्हणजे खाण्या पिण्याची चंगळ. चटपटीत पदार्थांसोबतच पौष्टिक खाऊची विविधता याच ¬तुत अनुभवण्यास मिळते. पण ही चंगळ करताना तब्येत सांभाळणं, चवीपेक्षाही पोषणाचा विचार करणं, वजन नियंत्रित ठेवणं या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. हिवाळ्यात वजन वाढतं हा अनुभव अनेकांचा असतो. आरोग्य कमवायचं तर वजनच कमावलं जातं. हे कसं वाढलं हे याचं कारणही कळत नाही. खरंतर हिवाळा हेच वजन वाढीचं मुख्य कारण आहे. खास हिवाळ्याशी संबंधित गोष्टी हिवाळ्यात वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. या समजून घेतल्या तर त्यावर नियंत्रण ठेवून उपाय करणं नक्कीच सोपं जाईल.
हिवाळ्यात का वाढतं वजन?
1. हिवाळ्यात गारठ्यामुळे , थंड हवेमुळे सकाळी लवकर उठवलं जात नाही. शरीरास उठण्यास हवी असलेली ऊर्जा हिवाळ्यात सकाळच्या वातावरणात मिळत नाही. लवकर उठून व्यायाम करण्याचा हिवाळ्यात कंटाळा येतो. नियमित व्यायाम करणारेही हिवाळ्यात गारठ्यामुळे व्यायामला अनेकदा बुट्टी मारतात. नियमित व्यायामात खंड पडणं यामुळे वजन वाढतं.
2. हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. यामुळे नेहमीपेक्षा जास्त झोपलं जातं. जास्तवेळ झोपूनही सुस्ती जात नाही. या सुस्तीचा हालचालींवर परिणाम होतो आणि शरीराची मंद हालचाल हे वजन वाढीस कारणीभूत ठरते.
3. थंडीमधे सुस्त वाटतं, उदास वाटतं, काही करु नये असं वाटतं. या मानसिकतेला सॅड असं म्हणतात. सॅड (SAD) म्हणजे सिझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर. या त्रासामुळे घरातून बाहेर पडण्याचा कंटाळा येतो, व्यायाम तर अजिबात करावासा वाटत नाही. घरातच जास्त काळ राहिल्यानं पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे खूप थकवा वाटतो. या थकव्यानं शारीरिक कामं कमी होतात आणि वजन वाढण्यास ह सॅड त्रास असा कारणीभूत ठरतो.
Image: Google
4. थंडी वाजते, काम करायला ऊर्जा मिळावी या कारणानं नेहमीपेक्षा जास्तवेळा चहा कॉफी प्यायली जाते. यामुळे जास्त साखर पोटात जाते. यामुळेही वजन वाढतं.
5. थंडीत भूक जास्त लागते. तसेच चटपटीत खावंसं वाटतं. भूक शमवण्यासाठी वरचेवर बिस्कीट, चॉकलेटस, चिवडा, भेळ , फास्ट फूड जास्त खाल्लं जातं. तेलकट-तूपकट पदार्थ जास्त खाल्ले जातात. थंडीत खाण्याच्या तुलनेत व्यायाम इतका होत नाही यामुळे वजन वाढतं.
Image: Google
हिवाळ्यात वजनावर काबू कसा ठेवणार?
1. हिवाळ्यात खूप सकाळी व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल तर लवकर उठून बाकीची कामं आधी आवरुन थोडं ऊन पडल्यावर बाहेर चालायला जावं किंवा व्यायाम करावा. काम केल्यानं शरीरात जी उष्णता निर्माण होते यामुळे व्यायाम करण्याची ऊर्जा मिळते आणि व्यायामही नीट होतो.
2. थंडी वाजते म्हणून घरात बसण्यापेक्षा उन्हात जावं. अंग उन्हानं शेकावं. याचा उपयोग सॅड मुळे जाणवणारी लक्षणं कमी होतात.
Image: Google
3. व्यायामाचा कितीही कंटाळा आला तरी व्यायाम करावा. बाहेर जाऊन व्यायाम करावासा वाटत नसेल तर घरातल्या घरात व्यायाम करावा.
4. आहारात जाणिवपूर्वक फायबर आणि पोषणमूल्य ज्यातून मिळतील असे पदार्थ उदा. फळं, भाज्या, धान्यं, विविध डाळी यांचा समावेश करावा.