Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट जास्तच सुटलंय, पूर्ण फिगर बिघडली? नाश्त्याला ५ पदार्थ खा, ३४ वरून २८ ची होईल कंबर

पोट जास्तच सुटलंय, पूर्ण फिगर बिघडली? नाश्त्याला ५ पदार्थ खा, ३४ वरून २८ ची होईल कंबर

Easy Breakfast Ideas to Lose Weight : लोकांना असं वाटतं की वेट लॉससाठी बेचव अन्न खावं लागतं पण असे अजिबात नाही. जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला  तर  शरीरात बदल दिसून येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 12:29 PM2023-08-06T12:29:44+5:302023-08-06T12:34:12+5:30

Easy Breakfast Ideas to Lose Weight : लोकांना असं वाटतं की वेट लॉससाठी बेचव अन्न खावं लागतं पण असे अजिबात नाही. जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला  तर  शरीरात बदल दिसून येईल.

Easy Breakfast Ideas to Lose Weight : 5 Healthy Breakfast Recipes to Help You Lose Weight | पोट जास्तच सुटलंय, पूर्ण फिगर बिघडली? नाश्त्याला ५ पदार्थ खा, ३४ वरून २८ ची होईल कंबर

पोट जास्तच सुटलंय, पूर्ण फिगर बिघडली? नाश्त्याला ५ पदार्थ खा, ३४ वरून २८ ची होईल कंबर

आजकाल लोकांमध्ये सगळ्यात कॉमन उद्भवणारी समस्या म्हणजे वजन वाढणं, वाढतं वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करतात तर काहीजण व्यायाम करतात. सध्या वेटलॉससाठी बरेच बरीच उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. तर किडो डाएट, इंटरमिटेंट फास्टींग अशा अनेक गोष्टींचा लोक आधार घेतात. पण या उपायात जर सातत्य नसेल तर तात्पुरता परीणाम दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय खाता हे फार महत्वाचं असतं.  (5 Healthy Breakfast Recipes to Help You Lose Weight)

लोकांना असं वाटतं की वेट लॉससाठी बेचव अन्न खावं लागतं पण असे अजिबात नाही. जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला  तर  शरीरात बदल दिसून येईल. नाश्ता हा दिवसभरातील सगळ्यात पहिले मील आहे. चांगला नाश्ता केला तर दिवसभर पोट भरलेलं राहतं आणि वारंवार भूकही लागत नाही. वजन कमी  करण्यासाठी नाश्ताला कोणते पदार्थ खायला हवेत पाहूया. (Healthy breakfast recipes to lose weight)

उपमा

जर तुम्ही डायटींगवर असाल तर नाश्त्याला रव्याचा उपमा खाऊ शकता. हा एक उत्तम ब्रेकफास्ट ऑप्शन आहे. उपम्यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. उपमा खाल्ल्यानंतर दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूकही लागत नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

पोहे

नाश्ताला पोहे खाणं हा वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. लोक नॉर्मली नाश्त्याला पोहे खातात पण काहीजणांना हा नाश्ता आवडत नाही. पोहे बनवताना त्यात शेंगदाणे घाला.  जेणेकरून तुम्हाला फायबर्ससह प्रोटीन्सही मिळतील. जास्तवेळ पोट भरलेलं राहील आणि सतत भूकही लागणार नाही.

ओट्स

जर तुम्हाला पटापट नाश्ता बनवायचा असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर ओट्स हा उत्तम पर्याय आहे. ओट्स पटापट तयार होतात. तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करू शकता. ओट्समध्ये फायबर्स असतात आणि ते चवीला सुपरहेल्दी असते. याशिवाय ओट्स खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरलेलं राहतं. ओट्सचे सेवन हार्ट आणि डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

दलिया

दलियामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. दलिया खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागत नाही.  याशिवाय शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते.

कॉर्नफ्लेक्स

नाश्त्याला दूध आणि कॉर्नफ्लेक्स हा उत्तम पर्याय आहे. कॉर्नफ्लक्स क्रंची असतात ज्यामुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. कॉर्नफ्लेसमध्ये थियामीन असते ज्यामुळे मेटाबॉलिक रेट आणि एनर्जी वाढते.  यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

चिला

बेसन, मुगाची डाळ किंवा ओट्सचा  मऊ डोसा हा सुद्धा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ओट्समध्ये बऱ्याच भाज्या, मसाले असतात.  यात फायबर्सही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खायलाही टेस्टी लागते. 

Web Title: Easy Breakfast Ideas to Lose Weight : 5 Healthy Breakfast Recipes to Help You Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.