Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटं करा ३ सोपे व्यायाम, दिसाल मस्त स्लीम-ट्रीम

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटं करा ३ सोपे व्यायाम, दिसाल मस्त स्लीम-ट्रीम

Easy Exercise for weight loss : वजन वाढायला वेळ लागत नाही पण ते कमी होण्यासाठी मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2023 04:55 PM2023-12-01T16:55:31+5:302023-12-01T17:00:05+5:30

Easy Exercise for weight loss : वजन वाढायला वेळ लागत नाही पण ते कमी होण्यासाठी मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात

Easy Exercise for weight loss : Do 3 simple exercises for 5 minutes every day to lose excess weight, you will look slim-trim | वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटं करा ३ सोपे व्यायाम, दिसाल मस्त स्लीम-ट्रीम

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटं करा ३ सोपे व्यायाम, दिसाल मस्त स्लीम-ट्रीम

वाढतं वजन ही सध्या सर्वच वयोगटातील एक महत्त्वाची समस्या आहे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच लठ्ठपणाची समस्या भेडसावते. लठ्ठपणा ही सुरुवातील एकच समस्या वाढते पण त्यामुळे कालांतराने बीपी, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या असे एक ना अनेक त्रास मागे लागतात. वजन जास्त असले तर अनेकदा समाजात वावरताना मानसिक ताण, न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता अशा समस्याही उद्भवतात. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वजन वाढायला वेळ लागत नाही पण ते कमी होण्यासाठी मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात (Easy Exercise for weight loss). 

जीवनशैलीविषयक समस्या हे वजनवाढीचे एक महत्त्वाचे कारण असून वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्यास ही समस्या आटोक्यात येण्यास मदत होते. बैठं काम, जंक फूडचे सेवन, ताणतणाव यांमुळे लठ्ठपणा वाढत जातो. व्यायाम, आहार, झोप, ताणतणाव यांचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो. रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ नसतो असे म्हणत असताना अगदी ५ मिनिटांचा वेळ काढून दररोज १ व्यायाम केल्यास शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते. फक्त यामध्ये नियमितता गरजेची आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ नेहा एक अतिशय सोपा व्यायाम शेअर करतात तो कोणता पाहूया..

(Image : Google)
(Image : Google)

१. सरळ उभे राहायचे आणि पायाचे तळवे वर उचलून विरुद्ध हाताने या तळव्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. हे करताना पाठ, कंबर ताठ राहील आणि वेगाने पायांची आणि हाताची हालचाल होईल याची काळजी घ्यायची. यामुळे मांड्या, कंबर यांवर जमा झालेली जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते. २५ चे ४ सेट म्हणजेच १०० वेळा हा व्यायामप्रकार केल्यास नक्कीच चांगला फायदा होतो.

२. पोटावर जमा झालेली चरबी हा बहुतांश स्त्रियांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यासाठी पाय काटकोनात वर उचलायचे आणि दोन्ही हाताने मांडीच्या खाली टाळी द्यायचा किंवा दोन्ही हात एकमेकांना लागतील असा प्रयत्न करायचा. याचेही २५ चे ४ सेट केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. 

३. बैठ्या कामामुळे आपल्या कंबरेच्या बाजूला फॅटस जमा व्हायला सुरुवात होते. हे फॅटस काही केल्या लवकर कमी होत नाहीत. यामुळे आपण फॅशनेबल कपडेही घालू शकत नाही. हा फॅट कमी होण्यासाठी एक अगदी सोपा व्यायाम आहे. गुडघा वर उचलायचा आणि विरुद्ध हाताचे कोपर गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हे नियमित केल्यास कंबरेच्या बाजूची चरबी निश्चित कमी होते. 


 

Web Title: Easy Exercise for weight loss : Do 3 simple exercises for 5 minutes every day to lose excess weight, you will look slim-trim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.