Join us  

पोटाचा घेर कमी करण्यासाठी १० मिनीटांत करा ४ सोपी आसनं, पोट राहील एकदम फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 9:54 AM

Easy Exercises for Belly Fat : पोटासाठी नियमितपणे कोणती आसनं करायची आणि त्याचा कशापद्धतीने फायदा होतो.

ठळक मुद्देपोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी नियमितपणे योगासनं करायला हवीतदैनंदिन गोष्टींमध्येही काही किमान बदल केल्यास वाढलेले पोट कमी होण्यास मदत होते

आपण जाड व्हायला सुरुवात झाली की सगळ्यात जास्त कोणता भाग वाढत असेल तर को पोटाचा. सततची बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहार यांमुळे पोटाचा घेर वाढायला लागतो. पोट, कंबर आणि मांड्या या भागात ही चरबी साठायला सुरुवात होते. एकदा पोट वाढले की ते लवकर कमी व्हायचे नाव घेत नाही. अशावेळी पोट कमी करण्यासाठी खास वेगळी आसनं करावी लागतात. इतकंच नाही तर प्रेग्नन्सीनंतरही वाढलेलं पोट कमी करण्यासाठी ही आसनं अतिशय उपयुक्त ठरतात. पाहूया पोटासाठी नियमितपणे कोणती आसनं करायची आणि त्याचा कशापद्धतीने फायदा होतो (Easy Exercises for Belly Fat). 

१. कंबरेवर शरीराचा बॅलन्स करुन पाय पुढे मागे करायचे. 

(Image : Google)

२. कोपरं आणि हात जमिनीवर टेकवून पायांचे पुन्हा पुढे-मागे करायचे. हे पाहायला सोपे वाटत असले तरी याने पोटाला चांगलाच ताण पडतो आणि पोट कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो.

३. सायकलिंग हा पोटासाठी अतिशय फायदेशीर ठरणारा व्यायामप्रकार आहे. पाठीवर झोपून दोन्ही पायांनी एकदा आतल्या बाजूने आणि एकदा बाहेरच्या बाजूने सायकलिंग करायचे. प्रत्येकी २० वेळा केल्यास पोटाचा घेर कमी होण्यास काही प्रमाणात मदत होते. 

४. पाठीवर झोपून डोकं वर उचलायचं आणि दोन्ही हातांने डोक्याला खालच्या बाजूने आधार द्यायचा. दोन्ही पाय एकदा सरळ करुन एकदा कपाळापर्यंत आणायचे. यामुळे पोटाच्या स्नायूंना ताण येऊन पोट कमी होण्याची शक्यता असते. 

सूचना

१. सुरुवातीला १० वेळा करा आणि मग हळूहळू संख्या वाढवत न्या.

२. नाडीशोधना प्राणायमाचा तुमच्या दैनंदिनीत समावेश करा.

३. जास्त वजन आणि कॅलरी मोजण्यात वेळ घालवू नका. तुमच्या शरीराचे ऐका आणि मानसिक तसेच शारीरिकरित्या फिट होण्यासाठी प्रयत्न करा. 

४. नेहमी जेवताना ८० टक्केच जेवा. 

५. आपला ताणतणावाच्या पातळीवर काम करा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदे