Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब

व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब

Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian : रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी फॅट टी चा आहाराचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 10:38 PM2024-10-18T22:38:47+5:302024-10-19T14:34:57+5:30

Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian : रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी फॅट टी चा आहाराचा समावेश करा

Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian : Simple Rules To Help Your Lose Up Tp 4 Kgs | व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब

व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. वजन कमी करण्यासाठी आवडीचे पदार्थ खाणं सोडावं लागेल, जीममध्ये तासनतास घाम  गाळावा लागेल असं प्रत्येकालाच वाटतं.(Health Tips) आहारातज्ज्ञांनी  काही सिक्रेट हॅक्स सांगितले आहेत ज्यामुळे तुमचं वजन सहज कमी होऊ शकतं. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही शरीरावरील चरबी कमी करू शकता. डायटिशियन नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या सर्टिफाईड पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ आहेत. (Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian)

वजन कमी करण्याचे हॅक्स

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी पोर्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे काही खात असाल तर त्यापेक्षा कमीत कमी खा. बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळा. वजन कमी करण्यासाठी साखर सोडण्यासोबतच तुम्हाला रिफाईंड तेलाचा वापर पूर्णपणे सोडावा लागेल. जेवण साजूक तुपात किंवा मोहोरीच्या तेलात बनवा.

जरा काही खाल्लं की आंबट ढेकर-ॲसिडीटी होते? 4 उपाय, 2 मिनिंटांत बर वाटेल-पोटही साफ राहील

रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी आयुर्वेदीक चहाचा आहाराचा समावेश करा. यासाठी पाण्यात आलं, दालचिनी, बडिशेप घालून उकळवून घ्या  त्यात लिंबाचा रस मिसळून प्या ज्यामुळे बेली फॅट कमी होईल.
याव्यतिरिक्त फास्टींग विंडो फॉलो करा. वजन कमी करण्याचा हा सोपा उपाय आहे. सुरूवातीला १२-१२ ची विंडो फॉलो करा. म्हणजेच १२ तास खा आणि १२ तासांचे फास्टींग  करा. १२ तासांच्या फास्टींगदरम्यान तुम्हाला दूध, चहा, कॉफी फळ किंवा इतर पदार्थ खाणं टाळायला हवं. तुम्ही पाणी, ग्रीन टी आणि ब्लॅक टी घेऊ शकता. 

तुळस छान वाढावी-डेरेदार व्हावी असं वाटतं? केळीच्या साली फेकू नका, ‘असा’ करा वापर-तुळस हिरवीगार

रोज कमीत कमी ४ लिटर पाणी प्या.  तुम्ही डिटॉक्स वॉटरला आपल्या रूटीनचा भाग बनवू शकता. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. रोज १० हजार पाऊलं चाला.  १ हजार पाऊलं चालण्यानं सुरूवात करा नंतर हळूहळू चालण्याचे प्रमाण वाढवा. सकाळी वॉक करा ते जमत नसेल तर संध्याकाळी किंवा रात्री वॉक करा.

Web Title: Easy Hacks To Reduce 4 kgs In 1 Month By Dietitian : Simple Rules To Help Your Lose Up Tp 4 Kgs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.