Join us  

मांड्या- हिप्सवरची चरबी वाढतेय? ५ पदार्थ खा- व्यायाम कमी करुनही वजन घटेल लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2023 5:50 PM

Easy Ways to Reduce Hips & Thighs Fat Naturally by Food : वजन कमी करण्यासाठी कोण म्हणतं खाणं कमी करा, पाहा ५ पदार्थ खाऊन वजन कमी कसे होते..

हिवाळ्यात कॅलरीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. मसालेदार आणि तळकट पदार्थ खाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. यामुळे वजन वाढते. शिवाय हवेतल्या गारव्यामुळे सतत काही ना काही खाण्याची इच्छा होत राहते. पण वर्कआउट करताना नाकीनऊ येतात. थंडीमुळे काहींना घर सोडवत नाही. ज्यामुळे नियमित वर्कआउटही होत नाही. सध्या बरेच जण अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत.

वर्क फ्रॉम होममुळे शरीराची हालचाल कमी होते. हालचाल कमी होत असल्यामुळे वजन तर वाढतेच शिवाय मांड्या आणि मागचा भाग वाढत जातो (Weight Loss Tips). जर आपल्याला वर्कआउट न करता वजनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर, पोषणतज्ज्ञ अजरा खान यांनी सांगितलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करून पाहा(Easy Ways to Reduce Hips & Thighs Fat Naturally by Food).

पोषणतज्ज्ञांच्या मते, 'वजन कमी करताना आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मुख्य म्हणजे पोर्शन कण्ट्रोलकडे लक्ष द्यायला हवे. याशिवाय हिवाळ्यात काही खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात सेवन करावे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.'

गाजर

गाजरात भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. अशावेळी आपल्याला उलट सुलट पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. गाजरामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, शिवाय स्टार्च फ्री असल्यामुळे याने वजन वाढत नाही. सध्या गाजराचा सिझन सुरु आहे, आपण गाजर खाऊन वजन कमी करू शकता.

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

दालचिनी

दालचिनी वजन कमी करण्यास खूप प्रभावी ठरते. शिवाय चयापचय बुस्ट करण्यास मदत करते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्स अँड व्हिटॅमिनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दालचिनीमधील सिनामल्डीहाइड फॅटी मेटाबॉलिझम बुस्ट करते. ज्यामुळे वजन जलद गतीने कमी होते. कोमट पाण्यात दालचिनी पावडर घालून प्यायल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते.

मेथी दाणे

मेथी दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, यासह इन्शुलिन स्राव नियंत्रित करून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. शिवाय मेटाबॉलिझम बुस्ट करते. मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारा पाण्यात विरघळणारा घटक म्हणजेच गॅलॅक्टोमनन, उलट सुलट पदार्थ खाण्याची क्रेविंग्स कमी करते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी आपण मेथीच्या दाण्यांचा चहा तयार करून पिऊ शकता.

बैठ्या कामाच्या नोकरीने बसून बसून मागचा भाग वाढला? फक्त १० मिनिटं करा १ सोपा व्यायाम

पेरू

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. शिवाय पचनक्रिया वाढवण्यासोबत चयापचय बुस्ट करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी लवकर कमी होते.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स