लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक डाएट, व्यायाम, सप्लिमेंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात पण तरीही रिजल्ट मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी आणि डाएट, व्यायाम करायलाच हवा असं नाही. आहारात छोटे बदल करून तुम्ही वजन आणि चरबी दोन्ही नियंत्रणात ठेवू शकता. (Easy Weight Loss Tips)
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी वेट लॉससाठी नाश्त्याला कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबाबत सांगितले आहे. नाश्त्याला एक पदार्थ खाऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. याशिवाय हृदय आणि हाडांचे आरोग्यही चांगले राहील. वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा ते पाहूया. (According to sadhguru eat cucumber in breakfast for natural weight loss tips)
काकडी आरोग्यासाठी फायदेशीर
सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काकडी जास्त फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यामते पाणीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि पीएच लेव्हल बॅलेंन्स करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत होते
काकडीत फायबर्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगाने होते. हे एक लो कॅलरी फूड आहे. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. सद्गुरु यांच्यामते बारीक होण्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.
काकडी खाण्याचे फायदे
१) सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी काकडीला व्हिटामीन के चा उत्तम स्त्रोत असल्याचे सांगितले आहे. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, बोन डेंसिटी वाढवण्यासाठी आणि कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तसंच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी काकडी फायदेशीर ठरते.
२) काकडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. यात अशी तत्व असतात ज्याला स्टिरॉल असं म्हणतात. यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३) काकडी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. यात पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तदाब वाढणं कमी होणं यांसारखे त्रास उद्भवत नाहीत.
४) नियमित काकडी खाल्ल्याने गॅस, एसिटीडीची समस्या दूर होते. याशिवाय खाल्लेल्या अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं.
५) काकडी त्वचा आणि केसांसाठी अमृतासमान आहे. काकडीमुळे केसांची वाढ चांगली होते. त्वचा चमकदार राहते. काकडीचा ज्यूस प्यायल्याने डाग दूर होण्यास मदत होते.