Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलं-फिगर बिघडली, कंबर जाड दिसतं? जेवणानंतर २ पदार्थ खा; झटपट स्लिम होईल पोट

पोट सुटलं-फिगर बिघडली, कंबर जाड दिसतं? जेवणानंतर २ पदार्थ खा; झटपट स्लिम होईल पोट

Easy Weight Loss Tips : डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 09:59 PM2024-08-27T21:59:38+5:302024-08-27T22:09:05+5:30

Easy Weight Loss Tips : डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल.

Easy Weight Loss Tips : Apple Cider Vinegar And Cinnamon Tea For Belly Fat Loss | पोट सुटलं-फिगर बिघडली, कंबर जाड दिसतं? जेवणानंतर २ पदार्थ खा; झटपट स्लिम होईल पोट

पोट सुटलं-फिगर बिघडली, कंबर जाड दिसतं? जेवणानंतर २ पदार्थ खा; झटपट स्लिम होईल पोट

लटकणारं पोट कोणालाच आवडत नाही. प्रत्येकालाच वाटतं की आपलं पोट सपाट असावं, पोटाची  हट्टी चरबी काढून टाकण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात पण एकदा पोटाची चरबी वाढली की ते कमी करणं कठीण असतं.(Easy Weight Loss Tips) खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट सुटू लागतं. अनेकदा हॉर्मोनल इम्बॅलेन्स, फिजिकल एक्टिव्हीटीज कमी होणं, स्ट्रेस यांमुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. (Apple Cider Vinegar And Cinnamon Tea For Belly Fat Loss) डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल. यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावे लागतील. (Belly Fat Loss Tips)

डाएट (Diet)  व्यतिरिक्त फिजिकल एक्टिव्हीजकडे लक्ष द्यायला हवं. पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट्सनी २ ड्रिंक्सबद्दल सांगितले आहे. या ड्रिंक्सना आपल्या डाएटचा भाग बनवल्यास खाल्लेल्या अन्नाचं पचन होईल. जेवणानंतर भरपूर पाणी प्या. ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल.  डायटिशियन मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मास्टर्स केले आहे. त्या हॉर्मोन आणि गट हेल्थ कोच आहेत.

वजन कमी करण्यासाठी एपल सायडल व्हिनेगर घ्या

एक्सपर्ट्सच्या मते बेली फॅट कमी करण्यासाठी जवळपास अर्धा तास आधी तुम्ही एपल सायडर व्हिनेगरचं सेवन करायला हवं. जवळपास १ छोटा चमचा एप्पल सायडर व्हिनेगर अर्धा ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. ज्यामुळे डायजेशन चांगले राहण्यास मदत होईल आणि सेल्समध्ये ग्लुकोज अपटेकमध्ये सुधारणा होईल. व्हिनेगर शरीराच्या कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. खासकरून बेली फॅट कमी करण्यास ते फायदेशीर ठरते.

 हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार व्हिनेगरनं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहण्यास मदत होते. एसिडीक नेचरमुळे बेली फॅट कमी करणं सोपं होतं. जेवणाच्या आधी एप्पल साडयर व्हिनेगरचं सेवन केल्यानं पोट आत जाण्यास मदत होते शुगर लेव्हलसुद्धा नियंत्रणात  येते. शरीर डिटॉक्स होते आणि मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते.   रोज सकाळी तुम्ही पाण्यासोबत याचे सेवन करू शकता.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी जेवणानंतर दालचिनीचं पाणी प्या

पोटाची चरबी कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी उत्तम उपाय आहे. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार जेवणानंतर हे पाणी प्यायल्यास इंसुलिन सेंसिटिव्ही सुधारण्यास मदत होते. दालचिनीतील एंटी ऑक्सिडेंट्स, फ्रि रॅडिकल्स कमी होण्यास मदत होते. फ्रि रेडिकल्स शरीराला नुकसान पोहोचवतात. ज्यामुळे लठ्ठपणा येत नाही.

खाण्यापिण्याबात WHO नं दिल्या गाईडलाईन्स; तब्येत चांगली ठेवायची तर काय खायचं, काय टाळायचं- पाहा

दालचिनी ब्लड शुगर लेव्हल मॅनेज करण्यास मदत करते. यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझ्म सुधारतो. अर्धा इंच दालचिनी २ कप पाण्यात घाला आणि कोमट करून हे पाणी गाळून प्या. पोटाची चरबी कमी करण्यासाठी या दोन्ही गोष्टी मदत करू शकतात.  

Web Title: Easy Weight Loss Tips : Apple Cider Vinegar And Cinnamon Tea For Belly Fat Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.