Join us  

वजन कमी करायचंय? करा फक्त ३ सोप्या गोष्टी, ३ आठवड्यात दिसेल तुमच्या फिटनेसमधला बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 9:08 AM

Easy Weight Loss Tricks : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. तर काहीजण दिवसभरातून फक्त एकदाच जेवणात आणि तासनतास जीममध्ये जाऊन व्यायाम करतात.

आजकाल लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वजन वाढवायला जितका वेळ लागतो तितकाच किंवा त्यापेक्षा दुप्पट वेळ वजन कमी करण्यासाठी लागू शकतो. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. (Easy Weight Loss Tricks) तर काहीजण दिवसभरातून फक्त एकदाच जेवणात आणि तासनतास जीममध्ये जाऊन व्यायाम करतात. कमी वेळात आपलं वजन कमी व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. वजन कमी करण्याासाठी आहारतज्ज्ञ सिमरन कौर यांनी अधिक माहिती दिली आहे. (How to Lose Weight Fast in 3 Simple Steps)

सकाळचा नाश्ता

दिवसाची सुरूवात  पॉवर पॅक नाश्त्याने करा. यामुळे तुमचा मेटाबॉलिझ्म  एक्टिव्ह होईल आणि क्रेव्हीग्स दूर होतीत. प्रोटीन्सयुक्त अंडी, फायबरने परिपूर्ण ओट्स, फळं या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा. वेट लॉससाठी लीन प्रोटीन एक उत्तम पर्याय आहे. लीन प्रोटीन खाल्ल्यानंतर तुम्हाला बराचवेळ भूक लागणार  नाही. नट्स, बीन्स, सोयाबीन, बदाम, पनीर  हे पदार्थ खायला हवेत. फायबर मेटाबॉलिझ्म वेगाने करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. वजन कमी करण्यासाठी फायबर्स आणि हाय प्रोटीन्सयुक्त पदार्थ खायला हवेत.

एक्टिव्हीज वाढवा

जास्तवेळ बसून राहिल्यानं वजन वाढतं. त्यासाठी रोज थोड्याफार प्रमाणात एक्टिव्हीज करा. डान्स, वॉकिंग किंवा कार्डिओ व्यायाम तुम्ही करू शकता. रोज १० हजार पाऊलं  चालण्याचं ध्येय ठेवा. लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा. दिवसभरात एकाचवेळी खूप जास्त खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात राहा.  वजन वाढण्याचं कारण रात्री उशीरा जेवणं  हे सुद्धा असू शकतं. जास्तीत जास्त लोक ९ किंवा १० नंतर डिनर करतात. यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी व्यवस्थित वेळ मिळत नाही.  पोषणाच्या अभावाने  शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.  चरबी कमी  करण्यासाठी रोज झोपण्याच्या कमीत कमी २ तास आधी जेवा.

हायड्रेट राहा

पाणी वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते. यासाठी नियमित पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवा. नारळपाणी, फळांचे ज्यूस प्या.  पण आर्टिफिशियल फळांचे ज्यूस पिणं टाळा कारण यात जास्त प्रमाणात साखर असते. साखर नसलेल्या ड्रिंक्सचा आहारात समावेश करा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स