वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक कार्ब्सच्या सेवनाबाबत काहीसे अलर्ट असतात. कारण कार्ब्स वजन वाढण्याचं मुख्य कारण आहेत. हे एक महत्वाचे मॅक्रोन्युट्रिएंट्सही आहे. (Health Tips) जे डाएटमधून पूर्णपणे वगळले जाऊ शकत नाही. इंडियन डाएटमध्ये चपाती, भात हे कार्ब्सचे मुख्य स्त्रोत आहेत. वजनावर नियंत्रण ठेवणारे लोक आपण किती खातो, काय खातो यावर व्यवस्थित लक्ष देतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असेलल्यांनी दिवसाला किती चपात्या खाव्यात असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. तर याचं उत्तर समजून घेऊ. (How Many Chapatis Should Eat For Weight Loss)
कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट्सयुक्त मॅक्रोन्युट्रिएंटसच्या स्वरूपात ओळखले जाते. याचा अर्थ असा की आपल्या शरीरातील विविध कार्यांना पूर्ण करण्यासाठी याची फार आवश्यकता असते. एका छोट्या चपातीत जवळपास ७१ कॅलरीज असतात. म्हणूनच अनेकांच्या दुपारच्या जेवणात जवळपास ३०० कॅलरीज असतात. जर तुम्ही २ चपात्या खात असाल तर यात १४० कॅलरीज असतात. बाकीच्या कॅलरीज तुम्ही चपातीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या आणि सॅलेडमधून घेऊ शकता. चपाती नाही तर काही भाज्या आणि फळांमध्येही कार्ब्स असतात.
एका दिवसाला किती चपात्या खाव्यात?
न्युजोनोमिक्सच्या रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तेव्हा चपाती खाल्ल्याने बरेच फायदे मिळतील. चपातीत बरेचसे न्युट्रिएंट्स असतात. लो फॅट चपातीमुळे डाएट कंट्रोल करण्यास मदत होते. एका दिवसाला गव्हाची चपाती तुम्ही चपाती खाऊ शकता हे कॅलरीजवर डिपेंड असते.
कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी शेफ संजीव कपूर यांची १ खास ट्रिक; व्हिटामीन मिळेल-खाल आवडीने
वजन कमी करण्यासाठी एका दिवसाला ४ चपात्या खाणं उत्तम मानलं जातं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता. या चपात्या गव्हापेक्षा जास्त हेल्दी असतात. यात जास्त पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात.
इफेक्टिव्हली वेट लॉस २ ते ३ चपातींचा आहारात समावेश करा. चपातीमुळे अजिबात वजन वाढत नाही. जास्त चपाती खाल्ल्याने कॅलरीज इन्टेक हाय होतो. मॉडरेशनमुळे हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यास मदत होते. चपाती पूर्ण गव्हाच्या पिठापासून तयार झालेल्या असतात. फायबर्सयुक्त चपातीमुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. संतुलित आहार घ्यायला हवा यातून शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो.