वजन कमी करण्यासाठी आहारात काही जाणीवपूर्वक बदल करणं आवश्यक आहे. वजन कमी होण्यासाठी नागली इतकंच मूग हे फायदेशीर कडधान्य आहे. वजन कमी होण्यासाठी नागली आणि मूगाच्या डाळीचे धिरडे फायदेशीर मानले जातात. नागली हे एक तृणधान्य असून आरोग्याच्या दृष्टीने नागलीला खूप महत्व आहे. नागलीमध्ये क, ई आणि ब जीवनसत्वं असतात. शिवाय नागलीमध्ये लोह, कॅल्शियम, ॲण्टिऑक्सिडण्ट, प्रथिनं, फायबर हे आरोग्यास उपयुक्त घटक असतात. नागलीमध्ये शरीरास आवश्यक कॅलरीज आणि गुड फॅटस असतात. नागलीचा आहारात समावेश केल्यास शांत झोप लागते. पचनव्यवस्था सुधारते. पोटाचं आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहातं. नागलीमुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. यासाठी नागलीचं धिरडं फायदेशीर ठरतं. नागलीच्या भाकरीपेक्षा नागलीच्या धिरड्यात कमी उष्मांक असतात. नागलीचं धिरडं हे ग्लुटेन फ्री असतं. वजन कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञ नागलीचं धिरडं खाण्याचा सल्ला देतात.
Image: Google
वजन कमी होण्यासाठी नागली इतकंच मूग हे फायदेशीर कडधान्य आहे. मुगामध्ये फायबर आणि कर्बोदकांचं प्रमाण भरपूर असतं. तर मुगामध्ये प्रथिनं असतात. शरीरास आवश्यक ती पोषणमुल्यं मुगात अस्तात. मुगामुळे फॅटस कमी आणि डाएटरी फायबर जास्त असतं. मुगामध्ये डायटरी फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यासाठी मूग फायदेशीर असतं. मुगातीला प्रथिनं लवकर पचतात. मुगाच्या सेवनामुळे चयापचय सुधारतं. आहारात मूग असल्यास रक्तदाब नियंत्रणात राहातो. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबरचं प्रमाण मुगात जास्त असतं. म्हणूनच मुगामुळे ह्दयाचं आरोग्य सुधारतं. मुगाच्या डाळीत फिनाॅलिक ॲसिड, कॅफिक आणि सिनॅमिक ॲसिड या ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीराचं कर्करोगास कारणीभूत अशा मुक्त मुलकांपासून संरक्षण होतं. मुगाच्या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं मुगाच्या डाळीचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर पटकन वाढत नाही.मुगामध्ये लोह, ब6, कॅल्शियम, मॅग्नेशियम , अ आणि क जीवसत्वं, पोटॅशियम हे घटक असल्याने मूग आहारात ठेवल्यास आजारांच्या संसर्गापासून संरक्षण होतं. नागली आणि मुगामधील पोषक तत्वांचा फायदा आरोग्यास होण्यासाठी म्हणूनच नागली आणि मुगडाळीच्या धिरड्यांना महत्व आहे. वेटलाॅससाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
नागलीचं धिरडं कसं करावं?
नागलीचं धिरडं करण्यासाठी 1 कप नागलीचं पीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडी चिरलेली कोथिंबीर, 1 टमाटा, 2 मोठे चमचे तेल, अर्धा कप दही, अर्धा चमचा धने पावडर, चिमूटभर हिंग. पाव चमचा काळे मिरीपूड. 1 कांदा, 1 लहान सिमला मिरची, 2 मोठे चमचे बेसन पीठ आणि चवीपुरतं मीठ घालावं.
Image: Google
नागलीचे धिरडे तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये नागलीचं पीठ घ्यावं. नागलीच्या पिठात बेसन आणि दही घालून ते चांगलं एकजीव करावं. नंतर यात टमाट, सिमला मिरची आणि कोथिंबीर हे साहित्य बारीक चिरुन टाकावं. ही सामग्री पिठात कालवल्यावर यात मीठ, लाल तिखट आणि मिरेपूड घालावी. यानंतर आमचूर पावडर, धने पावडर आणि हिंग घालावा. ही सर्व सामग्री घातल्यानंतर यात आवश्यक तेवढं पाणी घालून मध्यम स्वरुपाचं सरसरीत मिश्रण करावं. मिश्रण करुन झाल्यावर ते 5-10 मिनिटं सेट होवू द्यावं. नंतर तवा गरम करावा, ब्रशनं तव्यावर तेल लावून घ्यावं. नंतर एक चमचा मिश्रणाच घालून त्याचा कुरकुरीत डोसा तयार करावा. सकाळच्या वेळेस खाणार असाल तर दही, टमाटा केचप यासोबत तो छान लागतो तर रात्रीच्या जेवणात खायचा असल्या तो नुसताच खाल्ला तरी छान लागतो. किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतो.
Image: Google
मुगाचे धिरडे कसे करावेत?
मुगाचे धिरडे करण्यासाठी दीड कप मुगाची डाळ/ हिरवे मूग भिजवून, अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, तीन चर्तुथांश जीरे पावडर, अर्धा चमचा लसूण आणि आर्द्रकाची पेट आणि 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल घ्यावं. मुगाचे धिरडे करताना हिरवे मूग / डाळ 4-5 तास भिजवावी. ते चांगले भिजले गेले की डाळीतलं पाणी काढून टाकून मिक्सरमधून डाळ/ भिजलेले मूग बारीक करुन घ्यावेत.
Image: Google
वाटलेल्या डाळीत वर सांगितलेली सर्व सामग्री आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावं. या सरबरीर्त मिश्रणाचे डोसे कारावेत. दुपारी खाणार असल्यास सोबत दही खावं पण रात्री खाणार असल्यास हे डोसे टमाट्याचं साॅस आणि हिरव्या चटणीसोबत छान लागतात.