Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सुकामेवाच कशाला शेंगदाणे खा! शेंगदाणे खाण्याचे 7 घसघशीत फायदे ,कमवा तब्येत

सुकामेवाच कशाला शेंगदाणे खा! शेंगदाणे खाण्याचे 7 घसघशीत फायदे ,कमवा तब्येत

आरोग्यावर परिणाम, आरोग्यासाठी फायदे यांच्याबाबत बोलायचं झाल्यास कोणत्याही सुकामेव्या इतकेच प्रभावी असतात शेंगदाणे. आहारात शेंगदाणे असण्याचे आहेत अनेक फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 02:32 PM2021-09-23T14:32:39+5:302021-09-24T12:37:48+5:30

आरोग्यावर परिणाम, आरोग्यासाठी फायदे यांच्याबाबत बोलायचं झाल्यास कोणत्याही सुकामेव्या इतकेच प्रभावी असतात शेंगदाणे. आहारात शेंगदाणे असण्याचे आहेत अनेक फायदे.

Eat peanuts like dry fruits. 7 benefits of eating peanuts, earn health with peanuts | सुकामेवाच कशाला शेंगदाणे खा! शेंगदाणे खाण्याचे 7 घसघशीत फायदे ,कमवा तब्येत

सुकामेवाच कशाला शेंगदाणे खा! शेंगदाणे खाण्याचे 7 घसघशीत फायदे ,कमवा तब्येत

Highlightsअक्रोड, बदाम हे पौष्टिक नटस म्हणून ओळखले जातात. पण शेंगदाणेही त्यांच्याच बरोबरीनं पौष्टिक असतात. शेंगदाणे खाल्ल्याने हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.शेंगदाण्यात फॅटस आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. तरीसुध्दा हेच घटक वजन कमी करण्यास आणि स्थूलतेचा धोका टाळण्यास महत्त्वाचे ठरतात.

शेंगदाणे हे सध्या महाग झाले आहेत हे बरोबर आहे. पण आरोग्यासाठी सुकामेवा महत्त्वाचा असतो. हा सुकामेवा तर शेंगदाण्यांच्या तुलनेत खूपच महाग असतो. पण आरोग्यावर परिणाम, आरोग्यासाठी फायदे यांच्याबाबत बोलायचं झाल्यास कोणत्याही सुका मेव्या इतकेच प्रभावी असतात शेंगदाणे.

शास्त्रीय दृष्ट्या शेंगदाणे हे शेंगवर्गीय आहे. एरवी घरात इतर कोणता सुकामेवा नसेल पण शेंगदाणे मात्र असतातच. या शेंगदाणांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. शेंगदाण्याचा उपयोग गोड पदार्थांपासून ते मसालेदार, चमचमीत पदार्थांमधेही करता येतो. साधे पोहे ते पीनट बटर असा शेंगदाण्यांचा व्यापक उपयोग आहे. शेंगदाणे केवळ चवीसाठीच नाहीतर त्यांच्यातील गुणधर्मांमुळे प्रामुख्याने ओळखले जातात. शेंगदाण्यांमधे प्रथिनं, आरोग्यदायी फॅटस आणि इतर आरोग्यदायी पोषक घटक असतात. शेंगदाण्यातील हे गुणधर्म मधुमेह, हदयाशी निगडित आजर , कर्करोग यासारख्या आजारांचा धोका कमी करतात. तसेच शेंगदाणे हे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहेत असा त्यावरचा अभ्यास सांगतो. या शेंगवर्गीय शेंगदाण्याला ‘अराचिस हायपोगिआ’ हे शास्त्रीय नाव आहे.

शेंगदाण्यावर आरोग्याच्या दृष्टीनं झालेलं संशोधन सांगतं की गोड पदार्थ, केक, मिठाया, सॉसेस यामधे शेंगदाण्याचा उपयोग केल्यास त्याचा फायदा वजन कमी होण्यासाठी तर होतोच पण शेंगदाण्यामुळे हदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. आहारतज्ज्ञ गरिमा गोयल शेंगदाण्याचा आरोग्यास कसा फायदा होतो याबाबत विस्तृतपणे सांगतात.

आहारात शेंगदाणे असावेत कारण..

1. अक्रोड, बदाम हे पौष्टिक नटस म्हणून ओळखले जातात. पण शेंगदाणेही त्यांच्याच बरोबरीनं पौष्टिक असतात. शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन हदयाचं संरक्षण होतं. तसेच शेंगदाण्यामुळे रक्तात बारीक गाठी होत नाही. त्यामुळे हदयविकार, मेंदूला येणारे झटके याचा धोका खूपच कमी होतो.

2. संशोधनात असं आढळून आलं आहे की शेंगदाण्यात फॅटस आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. तरीसुध्दा हेच घटक वजन कमी करण्यास आणि स्थूलतेचा धोका टाळण्यास महत्त्वाचे ठरतात.

3. शेंगदाणे खाल्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका टळतो असं अभ्यास सांगतो . हा फायदा महिला पुरुष दोघांनाही होतो.

4. शेंगदाण्यांमधे केवळ प्रथिनं आणि आरोग्यदायी फॅटस असतात असं नाही तर जैवसक्रिय घटकांचा खजिना शेंगदाण्यात असतो. शेंगदाण्यात आयसोफ्लेवोनिससारखे अँण्टिऑक्सिडण्ट असतात. तसेच त्यात रिझर्व्हट्रोल आणि फायटिक अँसिड असतात. शेंगदाण्यात असलेल्या इ जीवनसत्त्वं आणि बायोटीन, लोह, नियासिन, फोलेट, मॅग्निज, फॉस्फरस, मॅग्नेशिअयम, थियामिन हे महत्त्वाचे घटक असतात. यातील लोह, फोलेट सारखे घटक तर गरोदरपणातही फार महत्त्वाचे असतात.

5. शेंगदाणे खाल्ल्यावर रक्तातील साखर वाढत नाही हे आढळून आलं आहे. त्यामुळे अभ्यासक शेंगदाण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो असं म्हणतात. तसेच शेंगदाण्यांचा सेवनानं महिलांच्या बाबतीत टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी झालेला अभ्यासात आढळून आला.

6. शेंगदाण्यांमधे मोठ्या प्रमाणात फायबर असतं. म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यास, शेंगदाण्याचे पदार्थ खाल्ल्यास समाधान मिळतं. शेंगदाण्यातील फायबरमुळे पचनसंस्थेस सूज, दाह यासारख्या विकारांचा धोका कमी होतो.

7. अभ्यास सांगतो की जेष्ठ वयाच्या लोकांनी पीनट बटर खाल्ल्यास पोटाचे विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा तसेच महिलांच्या बाबतीत स्तनांचा कर्करोग होण्याचा आजार धोका कमी होतो.
शेंगदाणे हे चविष्ट असतात, पौष्टिक असतात हे अगदी बरोबर. पण प्रत्येक गोष्टीला जशी चांगली वाईट बाजू असते तशी ती शेंगदाण्यालासुध्दा आहे. काहींना मूळातूनच शेंगदाण्याची अँलर्जी असते. शेंगदाण्यबद्दलची ही अँलर्जी खूप जणांमधे आढळते. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यावर मळमळ होत असल्यास, चेहर्‍यावर सूज दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अँलर्जी असतानही शेंगदाणे खाणं हे आरोग्यासाठी घोक्यचं समजलं जातं.

8. पण ज्यांना शेंगदाण्याची अँलर्जी नाही त्यांनी अवश्य शेंगदाणे खावेत. शेंगदाणे कच्चे, भाजून, मीठ घालून पाण्यात उकळून, तळून, कुकरमधे उकडवून खाता येतात. कुठल्याही पध्दतीने शेंगदाणे खाल्ले तर त्याचा फायदाच शरीराला मिळतो.

आहारात शेंगदाण्याचा समावेश करताना..

1. घरगुती बिस्कीटं करताना त्यात शेंगदाण्यांचा वापर करावा.
2. सलाडमधे उकडलेले शेंगदाणे घालता येतात.
3. पीनट बटर, पिकलेलं केळ एकत्र वाटून ते मिश्रण ब्रेडल लावून त्याचं आगळं वेगळं सॅण्डविच तयार करता येतं.
4. रश्याच्या किंवा कोरड्या भाज्यांना दाण्याचा कूट टाकल्यास भाज्या खमंग आणि पौष्टिक होतात.
5. शेंगदाण्याचे लाडू, बर्फी, सुकी, ओली चटणी, शेंगदाण्याच्या पोळ्या अशा स्वरुपात आपल्याला आहारात शेंगदाण्याचा समावेश करता येतो.

Web Title: Eat peanuts like dry fruits. 7 benefits of eating peanuts, earn health with peanuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.