Join us  

बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 9:08 AM

Eat Poha in breakfast for weight loss : पोह्यांमध्ये जास्तीत जास्त शेंगदाणे घाला जेणेकरून फायबर्सबबोरबर प्रोटीन्सही मिळतील. 

वजन कमी करण्याासाठी  रोजचा नाश्ता हेल्दी असणं फार महत्वाचं असतं. तर तुम्ही चांगला आहार घेतला तर दिवसभर शरीरात एनर्जी टिकून राहते. याशिवाय वाढेलंलं वजन कमी होत. बारीक होण्यासाठी अनेकजण सकाळचा नाश्ता करणं सोडतात जे फार चुकीचं आहे. (Eat Poha in breakfast for weight loss) नाश्त्याला तुम्ही अशा काही पदार्थांचा समावेश करू शकता  ज्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकतं. आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी हिंदी वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Is Poha Good for Weight Loss)

१) एक्सपर्ट्सच्या मते वजन घटवण्यासाठी पोहे हा एक हेल्दी ऑपश्न आहे. पण वजन कमी होण्यासाठी घाई करू नये. सातत्य ठेवून आपण रोज काय खातो आणि किती खातो याकडे लक्ष द्यावं. वजन कमी न होण्याचं कारण म्हणजे मेटाबॉलिझ्म योग्य नसणं. मेटाबॉलिझ्म बुस्ट करण्याकडे लक्ष द्यायला हवं.

२) पोह्यात आयर्न, फॉस्फरेस, व्हिटमान सी,  व्हिटामीन आणि कार्ब्स अधिक प्रमाणात असतात. यात कॅलरीज फार कमी असतात. यात फायबर्स भरपूर असतात ज्यामुळे गॅसचा त्रास होत नाही.

3) पोहे पचायला  हलके असतात. ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे त्यांनी आहारात पोह्यांचा समावेश करावा. तुम्ही फक्त नाश्त्यालाच नाही तर दुपारच्या जेवणातही पोहे खाऊ शकता. पोहे दह्याबरोबर खाल्ल्यासही चांगली चव लागते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोहे बनवण्याची योग्य पद्धत कोणती? (Poha Making tips)

१) वजन कमी करण्यासाठी खूप कमी तेलात पोहे करा.

२) पोह्यांमध्ये जास्तीत जास्त शेंगदाणे घाला जेणेकरून फायबर्सबबोरबर प्रोटीन्सही मिळतील. 

३) ऑलिव्ह ऑईलचा वापर करा किंवा कमी तूप घाला.

४)  हेल्दी फॅट्ससाठी तुम्ही यात काजूही घालू शकता. पोहे वाफेवर शिजवा जे तब्येतीसाठी जास्त हेल्दी असतात.

5) संध्याकाळच्यावेळी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी चिवडा हा उत्तम पर्याय आहे. चिवडा खाल्ल्याने जास्त वजनही वाढत नाही आणि स्नॅक्स खाण्याचा आनंद घेता येतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्य