Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात..

रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात..

भात खाण्याचे 3 फायदे; तरीही रात्री भात खावा की टाळावा? हा प्रश्न उरतोच; तज्ज्ञ काय म्हणतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 01:56 PM2022-04-12T13:56:47+5:302022-04-12T14:02:35+5:30

भात खाण्याचे 3 फायदे; तरीही रात्री भात खावा की टाळावा? हा प्रश्न उरतोच; तज्ज्ञ काय म्हणतात?

Eat rice at night or not? Avoid WhatsApp advice, see what experts say. | रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात..

रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात..

Highlightsभातात प्रामुख्यानं कर्बोदकं असल्यानं भात खाणं फायदेशीर ठरतं.पचन व्यवस्था सुधारण्यासाठी भात फायदेशीर भातातील आरोग्यदायी गुणधर्माचा लाभ शरीरास होण्यासाठी भात किती खावा, कधी खावा? याकडे लक्ष देणं महत्वाचं.

भात जेवणातला मुख्य आणि आवडीचा पदार्थ. भात आणि भाताचे विविध प्रकार म्हणजे पटकन होणारे, चविष्ट लागणारे आणि पोटभरीचे असतात त्यामुळे थकवा आला, उशीर झाला तरी भात करायचा  आणि खायचाही कंटाळा येत नाही.  करण्यास सोपा, चवीस उत्तम एवढीच भाताची वैशिष्ट्यं नाही. भातात प्रथिनं, फॅट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम हे आरोग्यदायी घटक असल्यानं भात आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण तरीही भाताविषयी अनेक गैरसमज आहेत.  भाताविषयी गैरसमज पसरवणारी मत मंतातरंही समाज माध्यमांवरुन सतत फिरत असतात. त्यामुळे भात खावा की टाळावा, भातानं वजन तर वाढणार नाही ना? असे गोंधळ उडवणारे प्रश्न पडतात. भाताविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी भाताबद्दलची शास्त्रीय माहीती असणं आवश्यक आहे. ही माहिती जाणून घेतल्यास रात्री भात खावा की नाही, खाल्ल्यास कसा याबाबतचं नेमकं उत्तरं मिळू शकेल. 

Image: Google

भात खाण्याचे फायदे

भात खावा की टाळावा या प्रश्नाचं उत्तर भातातल्या फायद्यांमध्ये दडलेलं आहे रात्री जेवणात भात खाण्याचे तीन फायदे आहेत. 

1. कर्बोदकं हा भातातील मुख्य घटक आहे. कर्बोदकांमुळे शरीराला उत्साह आणि ऊर्जा मिळते. कर्बोदकातून प्रात्प होणाऱ्या ऊर्जेमुळे दिवसभरातील कामं करण्याची शक्ती मिळते. कर्बोदकं हे शरीरासाठी इंधनासारखं काम करतं. भातात प्रामुख्यानं कर्बोदकं असल्यानं भात खाणं फायदेशीर ठरतं. 

2. पोटाच्या आरोग्यासाठी भात फायदेशीर असतो. वाफेवर शिजवलेला भात पचण्यास सहज असतो. पोटदुखी, अपचन या पोटाच्या विकारावरही भात  फायदेशीर ठरतो. पोट बिघडलेलं असल्यास दही भात खाल्ल्यानं पोटास आराम मिळतो. आरोग्यासाठी पांढऱ्या भातापेक्षा ब्राउन राइस खाणं आरोग्यदायी आहे. 

3. अन्नातील पोषक घटक शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचं काम पचन तंत्रं करतं. आणि हे कार्य पचन तंत्र/ व्यवस्था उत्तम काम करत असेल तरच साध्य होतं.भात पचन व्यवस्था उत्तम ठेवण्यास फायदेशीर असतो. पचन व्यवस्था कमजोर असल्यास ती सशक्त करण्यासाठी भातातील गुणधर्म उपयोगी पडतात. पोटात उष्णता निर्माण झाल्यास, पोटात आग आग होत असल्यास भात खाल्ल्यानं आराम मिळतो.

Image: Google

रात्री भात खावा की नाही?

भातात असलेल्या पोषक गुणधर्मामुळे भात खाणं आरोग्यास लाभदायी असतं हे खरं. पण तरीही रात्री भात खाण्याविषयी मतभिन्नता आहे. याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात हे बघणं जास्त महत्वाचं.

1. तज्ज्ञ म्हणतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रात्रीच्या जेवणाऐवजी दुपारच्या जेवणात मर्यादित प्रमाणात भात खावा. भातासोबत प्रथिनांचं भरपूर प्रमाणात सेवन करावं. रात्री भात खायचाच असल्यास हातसडीच्या तांदळाचा किंवा ब्राऊन राइसचा भात खावा. हातसडीच्या तांदळात आणि ब्राऊन राइसमध्ये कर्बोदकाच्या तुलनेत फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे पचनास आणि वजन कमी होण्यास फायदेशीर असतं.

2. सकाळी व्यायाम झालेला असल्यास, शारीरिक कष्टाची कामं करत असल्यास सकाळच्या जेवणात मर्यादित प्रमाणात भात खावा. पण शारीरिक कष्टाची कामं नसल्यास, तासनतास एकाच जागी बसून काम करायचं असल्यास  रात्रीच्या जेवणात भात टाळणं योग्य. दोन्ही वेळेसच्या जेवणात भात असल्यास तो वजन वाढीस कारणीभूत ठरतो. 

Image: Google

3. सर्दी खोकला झालेला असल्यास, सायनस आणि दम्याचा त्रास असल्यास जास्त भात खाणं त्रासदायक ठरतं.  अशा समस्यात दुपारच्या जेवणात थोडा भात खाणं लाभदायक असतं.  तज्ज्ञ म्हणतात, की भातातील गुणधर्मांमुळे भात खाणं आरोग्यास फायदेशीरच पण त्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं आवश्यक. वजन कमी करायचं असल्यास , सर्दी खोकला, सायनस आणि दम्याचा त्रास असल्यास दुपारच्या जेवणात मर्यादित स्वरुपात भात खावा आणि रात्रीच्या जेवणात तो टाळल्यास त्याचा आरोग्यास फायदा होतो. 
 

Web Title: Eat rice at night or not? Avoid WhatsApp advice, see what experts say.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.