साबुदाण्याची खिचडी ही बहुतेकांना आवडते. ती खाण्यासाठी उपवासाचाच बहाणा लागतो असं नाही. चवीची हौस भागवणारे साबुदाण्याचे विविध पदार्थ करता येतात. साबुदाणा आपण कशा प्रकारे खातो यावर साबुदाण्यानं (sago for weight loss) वजन वाढतं की कमी होतं हे अवलंबून असतं. वजन कमी करण्यासाठी साबुदाण्याचे रायते (sago raita for weight loss) खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आहार तज्ज्ञांच्या मते साबुदाण्यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळेच साबुदाणा खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. साबुदाणा खाल्ल्यानं लवकर भूक लागत नही. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी साबुदाणा खायचा झाल्यास साबुदाण्याचे रायते (how to make sago raita) करावे.
Image: Google
साबुदाण्याचे रायते कसे करावे?
साबुदाण्याचे रायते करण्यासाठी 1 कप भिजवलेला साबुदाणा, 4 कप दही, 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्त्याची पानं, छोटा चमचा मोहरी, 1 चमचा बारीक चिरलेला पुदिना, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा तेल , साबुदाणा उकळण्यासाठी पाणी आणि चिमूटभर चाट मसाला घ्यावा.
Image: Google
साबुदाणा रायते करताना एका भांड्यात पाणी गरम करावं. पाणी गरम झालं की त्यात साबुदाणा घालून तो 2-3 मिनिटं शिजू द्यावा. नंतर कढईत तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं फोडणीस घालावे. नंतर उकडलेला साबुदाणा दह्यामध्ये घालून तो चांगला मिसळून घ्यावा. साबुदाणा आणि दह्याच्या मिश्रणात फोडणी घालावी. फोडणी साबुदाण्यात मिसळून घ्यावी. हे रायते थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून तो थंड करुन घ्यावा. थंड झालेल्या साबुदाण्याच्या रायत्यामध्ये मीठ आणि थोडा चाट मसाला घालून रायते चांगले मिसळून घ्यावे. साबुदाण्याच्या रायत्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालावा. साबुदाण्याचे अशा पध्दतीनं केलेले रायते वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं.