Ayurvedic Diet Tips For Weight Loss: शरीरात हळूहळू चरबी जमा होऊ लागते आणि ही वाढलेली चरबी मोठ्या मेहनतीनंतर कमी होते. शरीरात जमा चरबीमुळे लठ्ठपणा तर वाढतोच, सोबतच अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अशात आयुर्वेदात अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यांद्वारे नॅचरल पद्धतीनं फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते. आयुर्वेद एक्सपर्टनी अशा पदार्थांबाबत सांगितलं आहे जे वजन कमी करण्याचं आणि चरबी कमी करण्याचं काम करतात.
मधाने चरबी होईल कमी
आयुर्वेदात मधाला सगळ्यात चांगलं फॅट बर्नर मानलं जातं. चवीला गोड असलेलं मध गरम असतं. हे सहजपणे पचन होतं आणि शरीरात वात दोष कमी करण्यास मदत करतं. मधाने शरीरातील सूज किंवा इन्फ्लेमेशनही कमी होतं. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात थोडं मध आणि लिंबाचा रस टाकून पिऊ शकता.
जवाचं पाणी
लठ्ठपणा आणि शरीरात जमा झालेली चरबी बर्न करण्यासाठी जवाचं पाणी खूप फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसच्या रूग्णांसाठी सुद्धा जवाचं पाणी फायदेशीर असतं. याने शरीराला पोषण मिळतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी जवाचं पाणी फायदेशीर ठरू शकतं. याने वजन कमी होण्यासोबत पचन तंत्रही मजबूत होतं. तसेच जवाच्या पाण्याने शरीराची कमजोरीही दूर होते. यासाठी रात्रभर जवाचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून प्या.
आल्यानं कमी होईल लठ्ठपणा
चहासोबतच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलं जाणारं आलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. आलं गरम असतं. आल्याचं मदतीनं पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच आल्यानं चरबीही कमी होते. महत्वाची बाब म्हणजे आल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी आल्याचा एक तुकडा बारीक करा आणि ते चहा किंवा हर्बल टीमध्ये टाकू शकता.