Join us  

मोदक खाणं आहे भारीच पौष्टिक, वाचा गणरायाच्या आवडीचे मोदक खाण्याचे 13 फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 1:39 PM

Health Benefits of Eating Modak: मोदक खायला आवडतात ना? मग मनसोक्त खा कारण त्यातून शरीराला अनेक लाभ मिळतात.

ठळक मुद्दे सारण म्हणून बहुतांश घरांमध्ये गूळ, खोबरं, खसखस या पदार्थांचा वापर केला जातो. त्यांचा नेमका शरीराला कसा लाभ मिळतो ते पाहूया..

मोदकाचे अनेक प्रकार आहेत. पण उकडीचे मोदक (Modak recipe), कणकेचे मोदक, रव्याचे मोदक असे मोदकाचे काही प्रमुख प्रकार मानले जातात. यामध्ये रव्याचे मोदक किंवा कणकेचे मोदक जे असतात, त्यात सारण म्हणून बहुतांश घरांमध्ये गूळ, खोबरं, खसखस या पदार्थांचा वापर केला जातो. शिवाय नैवेद्याचे मोदक तळण्यासाठी चांगलं तूप वापरलं जातं. हे सगळे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्यांचा नेमका शरीराला कसा लाभ मिळतो (Why modak is beneficial for health?) ते पाहूया..

 

मोदक खाण्याचे फायदे(Benefits of eating modak)गूळ१. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त असते. त्यामुळेच अपचनाचा त्रास कमी होतो.

२. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते, अशा व्यक्तींना नियमितपणे गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

३. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. 

४. फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये चांगले असते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी गूळ अतिशय उपयुक्त ठरतो.

५. गुळामध्ये झिंकदेखील योग्य प्रमाणात असते.

 

खोबरे १. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खोबरे खाणे चांगले असते.

२. खोबऱ्यामध्ये प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात असते. 

३. चांगले फॅट्स तसेच ॲण्टीऑक्सिडंट्सदेखील खोबऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतात.

४. तसेच त्यात ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्मही असतात. 

५. खनिजे आणि कार्बोहायड्रेट्स यांचे प्रमाण देखील खोबऱ्यात भरपूर असते. 

 

खसखस १. खसखसमध्ये कॅल्शियम, झिंक, कॉपर यांचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी खसखस खाणे फायदेशीर ठरते.

२. मनावरचा ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी खसखस फायदेशीर ठरते.

३. खसखसमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी खसखस खाणे फायद्याचे ठरते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सगणेशोत्सवआहार योजनाहेल्थ टिप्स