वजन कमी करण्यासाठी ओट्स (eating oats) खाणं फायदेशीर मानलं जातं. स्टील कट ओट्स, रोल्ड ओट्स, ओट ग्राॅस या कोणत्याही स्वरुपातील ओट्स खाणं आरोग्यास लाभदायक आणि वजन कमी करण्यास फायदेशीर मानले जातात. ओट्समध्ये प्रामुख्याने कर्बोदकं असतात. 12 टक्के प्रथिनं, 7.4 टक्के मेद आणि 75 टक्क्यांपेक्ष अधिक कर्बोदकं असतात. ओट्समध्ये उष्मांकाचं प्रमाण 150-152 इतकं असतं. पण म्हणून ओट्स रोजच (eating oats daily) खावेत का? ओट्स रोज खाल्ल्याने त्याचा फक्त फायदाच होतो की दुष्परिणामही( side effects of eating oats) असे प्रश्न रोजच्या आहारात ओट्सचा समवेश करताना पडतात. ओट्स संदर्भातल्या शंकांचं समाधान गाजियाबाद येथील कोलंबिया आशिया हाॅस्पिटल येथील आहरतज्ज्ञ डाॅ. आदिती शर्मा देतात. त्या ओट्स खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरावर कोणते दुष्परिणाम (disadvantages of eating oats) होतात याबद्दल सविस्तर माहिती देतात.
Image: Google
अतिप्रमाणात ओट्स खाल्ल्यास..
1. रोज ओट्स खाल्ल्याचा परिणाम पचन क्रियेवर होवू शकतो. रोज ओट्स खाण्याच्य सवयीमुळे पचन क्रिया मंद होते. यामुळे पोट गच्चं वाटणं, फुगणं या समस्या निर्माण होतात. ओट्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ओट्सचा समवेश नव्यानेच आहारात करणार असतील तर ओट्स थोड्या प्रमाणात खायला हवेत. एका वेळेस थोडे ओट्स खावेत. ओट्समध्ये असलेलं फायबर, गुल्कोज, स्टार्च हे घटक पोटात आणि मोठ्या आतड्यात असलेले जिवाणू खातात. यामुळे ओट्स खाल्ल्याने पोट फुगण्याची , गॅसेस होण्याची समस्या होते. म्हणून ओट्स हे कमी प्रमाणातच खायला हवेत.
2. ओट्स जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढण्याचाही धोका असतो. त्यामुळे ओट्स खाताना त्यात काय मिसळून खातोय याकडे विशेष लक्ष हवं. ओट्समध्ये जवस किंवा अक्रोड मिसळून खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. पण ओट्समध्ये साखर टाकून खाल्ल्यास ओट्स वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. आरोग्याचा विचार करता साखर घालून ओट्स खाणं हे आरोग्यास नुकसानकारक असतं.
Image: Google
3. नुसते ओट्स खाल्ल्यास त्याची चव आवडत नाही. ते चविष्ट होण्यासाठी त्यात साखर किंवा इतर गोड पदार्थ घालून चविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ओट्स चविष्ट करुन खाण्याच्या नादात ओट्समधील पोषणमूल्यं नष्ट होतात. अशा प्रकारे ओट्स खाल्ल्यास ते आरोग्यदायी न होता आरोग्यास अपायकारक ठरतात. अशा प्रकारे ओट्स खाल्ल्यानं शरीरात जास्तीचे उष्मांक आणि फॅट्स जातात. यामुळे वजन वाढतं आणि शरीरात साखरही प्रमाणापेक्षा जास्त होते.
Image: Google
4.वजन कमी करण्याचा उद्देश ठेवून रोज केवळ ओट्सचं खात राहिल्यास स्नायू कमजोर होतात. कारण ओट्स खाल्ल्यानं पोट सतत भरलेलं राहातं, भूक लागत नाही. त्यामुळे ओट्स खाल्ल्यानंतर व्यवस्थित जेवलं जात नाही. त्याचा परिणाम स्नायुंना आवश्यक असलेलं पोषण मिळत नाही आणी स्नायू कमजोर होतात. ओट्समुळे शरीरास आवश्यक पोषक गुणधर्म न मिळाल्यानं कुपोषणाचा धोका निर्माण होतो.
Image: Google
5. ओट्समध्ये एवेनिन नावाचं प्रथिनं असतं. या घटकामुळे अनेकांना ॲलर्जी होवून पचनाशी निगडित समस्या निर्माण होतात. सीलिएक नावाचा आजार असलेल्यांसाठी ओट्स नियमित खाणं हे हानिकारक ठरतं. ओट्स खाल्ल्यानंतर जर अस्वस्थ वाटत असल्यास ओट्स खाणं थांबवायला हवं.
ओटस जरी पूर्णपणे सेंद्रिय आणि ग्लुटेन फ्री अन्नाचा प्रकार असला तरी ओट्स खाताना काळजी घ्यायला हवी. ते किती वेळा खातोय, एका वेळी किती खातोय, त्यात काय मिसळून खातोय या सर्वांचा बारकाईनं विचार व्हायला हवा.