Join us  

वेटलॉससाठी एक वेळच्या जेवणात फक्त फळंच खाता? त्याचा खरंच फायदा होतो? वाचा तज्ज्ञांचा सल्ला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2022 3:36 PM

Fruits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दुपारचं किंवा रात्रीचं जेवण टाळून त्याऐवजी फक्त फळंच खायची, असं अनेक जण करतात. बघा ते करतात ते चूक आहे की बरोबर..

ठळक मुद्देजेवण टाळून केवळ फळांवर राहणं आरोग्यासाठी खरंच चांगलं असतं का? तुम्हीही अशा पद्धतीचं डाएट करत असाल, तर हा व्हिडिओ एकदा बघाच.

वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. ज्याला जो पर्याय आवडतो, तो पर्याय निवडून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण तर याबाबतीत तज्ज्ञांचा काेणताही सल्ला घेत नाहीत. आपल्याला काय सोयीस्कर ठरतेय, ते बघतात आणि त्यानुसार मग वेटलॉसच्या मागे लागतात. किंवा काही जण इतरांना डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकून अगदी आंधळेपणाने इतरांचा डाएट प्लॅन फॉलो करतात. असाच सध्या एक वेटलॉस ट्रेण्ड (Fruits For Weight Loss) आला आहे. यामध्ये फळं खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.(Eating only fruits in dinner or in lunch ) 

 

तसंही फळं खायला अनेक जणांना आवडतं. त्यामुळे मग दुपारचं किंवा रात्रीचं असं कोणतं तरी एक वेळचं जेवण टाळायचं आणि त्याऐवजी वेगवेगळी फळं भरपूर प्रमाणात खायची, असं अनेक जण सध्या करत आहेत.

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय टोमॅटो खाण्याचे ७ फायदे, सौंदर्य- आरोग्य दोन्हींसाठी उपयुक्त 

पण असं एक वेळचं जेवण टाळून आणि त्याऐवजी फक्त फळं खाऊन खरोखरंच वेटलॉस होतो का? फळं ही आरोग्यासाठी चांगलीच आहेत. पण जेवण टाळून केवळ फळांवर राहणं आरोग्यासाठी खरंच चांगलं असतं का? या गोष्टींचाही एकदा विचार केला पाहिजे. म्हणूनच तुम्हीही अशा पद्धतीचं डाएट करत असाल, तर thejuhikapoor या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झालेला हा व्हिडिओ एकदा बघाच.

 

जेवण टाळून फळं खाणं खरंच योग्य आहे?१. जेवणातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स मिळतात. पण जेवण टाळून फळं खाल्ल्याने प्रोटीन्सची कमतरता जाणवते. त्यातून शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात.

काकुंनी केला भन्नाट कोंबडी डान्स!! लग्नात अशा जबरदस्त नाचल्या की... पाहा व्हायरल व्हिडिओ 

२. कार्बोहायड्रेट्स पुरेशा प्रमाणात नाही मिळाले तर शरीरात उर्जा टिकून राहणार नाही. त्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवेल.

३. शरीराला हेल्दी फॅट्सची गरज असते. ते नाही मिळाले तर सांधेदुखीसह इतर अनेक आजार मागे लागू शकतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफळेहेल्थ टिप्स