Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भात- खिचडीसारखे आवडते पदार्थ वजन वाढेल म्हणून खाणं टाळता? बघा हे कितपत खरं 

भात- खिचडीसारखे आवडते पदार्थ वजन वाढेल म्हणून खाणं टाळता? बघा हे कितपत खरं 

Does Rice Make You Gain Weight?: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? बघा याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 17:04 IST2025-03-24T17:04:03+5:302025-03-24T17:04:56+5:30

Does Rice Make You Gain Weight?: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? बघा याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत....

eating Rice or khichadi At Night Does It Lead To Weight Gain? does rice really responsible for weight gain? | भात- खिचडीसारखे आवडते पदार्थ वजन वाढेल म्हणून खाणं टाळता? बघा हे कितपत खरं 

भात- खिचडीसारखे आवडते पदार्थ वजन वाढेल म्हणून खाणं टाळता? बघा हे कितपत खरं 

Highlightsजर तुम्ही साधारण एक वाटी शिजवलेला भात खाल्ला तर त्यातून तुमच्या शरीरात २०० कॅलरीज आणि ४५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स जातात.

भात म्हणजे अनेक लोकांच्या आवडीचा पदार्थ. मग तो तूप- मीठ भात असो मेतकूट भात असो वरण- भात असो किंवा फोडणीचा भात असो. लोणच्यासोबत, दह्यासोबत भात खाणारेही अनेक असतात. पण भात एवढा प्रचंड आवडत असूनही काही जण तो खाणं मात्र पूर्णपणे टाळतात. रात्रीच्यावेळी तर भात किंवा खिचडी खायला कटाक्षाने नाही म्हणतात. याचं कारण एकच की भात खाऊन वजन वाढतं असं त्यांनी ऐकलेलं असतं (Does Rice Make You Gain Weight?). यामध्ये किती तथ्य आहे आणि याविषयी झालेले वेगवेगळे अभ्यास काय सांगतात ते आता पाहूया... (eating Rice or khichadi At Night Does It Lead To Weight Gain?)

 

भाताबाबत नेहमीच असं बोललं जातं की रात्रीच्या वेळी भात अजिबात खाऊ नये. पण बहुतांश घरांमध्ये तर बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात गरमागरम खिचडी केली जाते. मग हे कितपत योग्य आहे? याविषयी Journal of Obesity- 2013 यांच्यातर्फे जो अभ्यास प्रकाशित करण्यात आला, त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की रात्रीच्या वेळेस भात खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाही.

पाहा घरीच खोबरेल तेल तयार करण्याची अस्सल दाक्षिणात्य पद्धत- विकतचं तेल आणणंच विसराल..

भात खाल्ल्यानंतर पुरेशा प्रमाणात शारिरीक हालचाली झाल्या तरच तो पचतो आणि वजन वाढत नाही, त्यामुळे भात दिवसाच खावा असं आपण ऐकलेलं असतं. याबाबत Journal of Obesity या अभ्यासात असं विश्लेषण देण्यात आलेलं आहे की आपलं शरीर झोपलेलं असलं तरीही अन्नपचनाची क्रिया शरीरात सातत्याने सुरूच असते.

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? 'या' पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत 

त्यामुळे रात्री खाल्लेला भात- खिचडी पचत नाही आणि त्यामुळे वजन वाढतं असं काही नाही. याविषयी American Journal of Clinical Nutrition यांच्या वतीने आणखी एक अभ्यास करण्यात आला असून त्यानुसार जर तुम्ही रात्रीच्या वेळी योग्य प्रमाणात भात किंवा खिचडी खाल्ली तर त्यामुळे वजन वाढत नाही.

 

भाताबद्दलचे गैरसमज 

भातामध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे वजन वाढतं असं आपण ऐकत आलेलो आहोत. पण खरंतर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जातात आणि त्यामुळे वजन वाढतं असं तज्ज्ञ सांगतात.

टॉयलेट सीटवर पडलेले पिवळे डाग २ मिनिटांत निघून जातील! 'हा' पदार्थ वापरून करा स्वच्छता

जर तुम्ही साधारण एक वाटी शिजवलेला भात खाल्ला तर त्यातून तुमच्या शरीरात २०० कॅलरीज आणि ४५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स जातात. रात्रीच्यावेळी भात खायचा असेल तर त्या भातासोबत डाळी, पनीर, वेगवेगळ्या भाज्या असे प्रोटीनयुक्त पदार्थही खा. जेणेकरून त्यातून पूर्ण पोषण मिळेल आणि वजन वाढणार नाही. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी ब्राऊन राईस किंवा रेड राईस खाण्यास प्राधान्य द्यावे. याशिवाय भातासोबत भरपूर प्रमाणात भाज्या आणि प्रोटीन्स घ्यावेत. 

 

Web Title: eating Rice or khichadi At Night Does It Lead To Weight Gain? does rice really responsible for weight gain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.