Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उपवास किंवा डाएट म्हणून फक्त फळंच खात असाल तर... अतिरेक पडेल महागात

उपवास किंवा डाएट म्हणून फक्त फळंच खात असाल तर... अतिरेक पडेल महागात

फळं खाण्याची योग्य रीतच अनेकांना माहित नसते केवळ भरपूर फळं खा असा प्रचार होतो आणि त्याला ते बळी पडतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 04:00 PM2022-05-20T16:00:29+5:302022-05-20T16:03:52+5:30

फळं खाण्याची योग्य रीतच अनेकांना माहित नसते केवळ भरपूर फळं खा असा प्रचार होतो आणि त्याला ते बळी पडतात..

eating too much fruits daily for detox for weight loss or fasting, is it good or bad? | उपवास किंवा डाएट म्हणून फक्त फळंच खात असाल तर... अतिरेक पडेल महागात

उपवास किंवा डाएट म्हणून फक्त फळंच खात असाल तर... अतिरेक पडेल महागात

Highlightsळं खाण्याची योग्य रीत समजून घ्यायला हवी आणि अतिरेकही टाळायला हवा.

राजश्री कुलकर्णी (M.D. आयुर्वेद)

भरपूर फळं खा, उपास असेल तर फळं खा, डाएट असेल तर फळं खा, ज्यूस प्या, स्मूदी प्या, शहाळ्याचं पाणी प्या असं करुन अनेकजण हल्ली आहारात भरपूर फळं खातात. सॅलेड्स खातात. त्यातही डिटॉक्स करायचं म्हणून तर अनेकजण भरपूर फळंच खातात. मात्र उपवास म्हणून किंवा डाएट म्हणून फक्त फलाहार करत राहिलं, फक्त फळंच खाल्ली तर चालतं का? ते खरंच तब्येतीसाठी चांगलं असतं का? बाजारात मिळणारी फ्रूट डिश सर्रास रोज खाल्ली तर शरीराला पोषण मिळतं का? असे प्रश्न अनेक आहेत. त्यामुळे फळं खाण्याची योग्य रीत समजून घ्यायला हवी आणि अतिरेकही टाळायला हवा. त्यामुळे फळं खाण्याचे काही नियम लक्षात ठेवावेत..

१. फळांचा रस म्हणजे ज्यूस काढून पिऊ नये. अख्खं फळ खाणं जास्त फायदेशीर.  फळातील गर त्यामुळे वाया जात नाही तसेच रस हा पूर्ण फळापेक्षा पचायला जड असतो. शिवाय फळातील तंतुमय पदार्थ, रेषा या पोट साफ राहण्यासाठी मदत करतात.  पूर्ण फळ खाल्ल्याने पोट भरते.

२. ताजी फळे खाल्ल्याने रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात कारण फळांमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात. पण फळं ताजीच हवीत, स्थानिक असणं जास्त चांगलं. 

३.  ज्या ऋतूत मिळतात जी फळं मिळतात तीच फक्त खावीत. देशी विदेशी फळं जी नॉन सिझनल असतात ती वर्षभर मिळतात म्हणून खाऊ नयेत.

४.  दूध आणि फळं मिक्स करून फ्रूटसॅलड करुन खाऊ नयेत.५. फळंच खाऊन रहायचं बाकी काहीच खायचं नाही असा आहारही योग्य नव्हे.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

rajashree.abhay@gmail.com

Web Title: eating too much fruits daily for detox for weight loss or fasting, is it good or bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.