Join us  

काही केल्या सुटलेलं पोट कमीच होत नाही? खा ५ गोष्टी, पोटावरची चरबी घटेल- दिसाल स्लिम लवकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 1:07 PM

Effective food combinations for weight loss : यातील पोषक तत्वांचे कॉम्बिनेशन्स शरीरात जमा झालेले फॅट्स कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी शरीर ठेवण्यासाठी क्रॅश डाएट आणि क्विक ट्रिटमेंट्स हा निरोगी उपाय नाही. (Weight Loss Diet) हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करून तुम्ही फॅट्स  बर्न करू शकता. यातील पोषक तत्वांचे कॉम्बिनेशन्स शरीरात जमा झालेले फॅट्स कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी लाईफस्टाईल बदण्याची गरज असते. आपण काय खातो यावर आरोग्य आणि पर्सनॅलिटी अवलंबून असते. याचा आरोग्यावर चुकीचा परिणामसुद्धा होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी आहाराची महत्वाची भूमिका असते. काही फूड कॉम्बिनेशन्स (Healthy food combinations )वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकता. यामुळे वजन वेगानं घटेल आणि तुम्ही फिट मेंटेन राहाल. (Effective food combinations for weight loss)

भाज्या आणि सोयाबीन

यात प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स जास्त दिसून येतात. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहारातून काही पदार्थ वगळावे लागतात तर डाएट एडजस्ट करावे लागते. ताज्या हिरव्या भाज्या प्रोटीन्स आणि पोषक तत्वांचा एक उत्तम स्त्रोत आहेत. ज्यामुळे शरीरात चांगला बॅलेंन्स राहतो. 

दलिया आणि नट्स

डायटरी फायबर्स मेटाबॉलिझ्म आणि वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन देतात. हाय फायबर्स कंटेटमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. म्हणून आहारात ड्रायफ्रुट्स, दलिया, नट्सचा समावेश करा. 

दही आणि बेरीज

प्रोटीन्सयुक्त डेअरी उत्पादनं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. आहारात प्रोटीन्स असतील तर शरीर अन्न पचवताना जास्त कॅलरीज खर्च करते. दह्यात ब्लूबेरी, स्ट्रोबेरी यांसारखे एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त फळं मिसळून खाल्ल्यानं अधिकाधिक फायदे मिळतात.

अंडी आणि शिमला मिरची

अंडी प्रोटिन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करावा. शिमला मिरची व्हिटामीन सी चा एक चांगला स्त्रोत आहे. हे कॉम्बिनेशन वजन कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं.

पीनट बटर आणि सफरचंद

सफरचंद आणि पीनट बटर पोषक तत्वांचे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे जे वजन कमी करण्यास मदत करते. सफरचंद लो कॅलरी फूड आहे यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स