सध्याच्या स्थिती वजन वाढणं आणि लठ्ठपणामुळे सर्वच वयोगटातील लोक त्रस्त आहेत. (Weight Loss Tips) लठ्ठपणामुळे फक्त तुमचे लुक्स खराब होत नाहीत तर डायबिटीस, हृदयाचे आजार, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. (Yoga For Slim Belly) बाजारात मिळणारे तळलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन याचे सगळ्यात मोठे कारण आहे. चुकिची लाईफस्टाईल तासनतास एकाच जागी बसून काम करणं यामुळे पोटाची चरबी अधिकच वाढत जाते. (How to Lose Weight Fast in 3 Simple Steps)
लटकणारं पोट कमी करण्यासाठी तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल आणि योगा प्रकारांचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करू शकता. व्यायाम आणि योगा प्रकार तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. योग शिक्षक रजनीश शर्मा यांनी लटकणारं पोट की करण्यासाठी ३ सोपी योगासनं सांगितली आहेत.
१) गत्यात्मक मेरू वक्रासन
हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त मांसपेशी मजबूत राहण्यासही मदत होते. गत्यात्मक मेरू वक्रासनचा नियमित अभ्यास केल्याने तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. हा योगाप्रकार करण्यासाठी सगळ्यात आधी योगा मॅट आणि दोन्ही पाय पसरवून बसा. त्यानंतर दोन्ही पाय वेगवेगळे करा. श्वास सोडा आणि पुन्हा डाव्या बाजूला वळा आणि अंगठ्याच्या समोर आणा.
रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम
२) चक्की चालासन
हे आसन बेली फॅट कमी करण्यासाठी गुणकारी आहे. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी बसून घ्या त्यानंतर दोन्ही हात एकत्र जोडा आणि डाव्या बाजूला फिरवा. १० ते १५ वेळा हा उपाय करा. नंतर डाव्या बाजूला फिरवा. चक्की चालासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे कंबर स्लिम होण्यासही मदत होते.
कितीही भात खा, १ इंचही पोट सुटणार नाही, डॉक्टर सांगतात भात शिजवण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल
३) नौका संचालसन
पोटाची चरबी कमी करण्यासाठी नौका संचालनासन हा बेस्ट व्यायाम आहे. नौका संचालनासन हा योगाप्रकार नियमित केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पाय पसरवून बसा आणि हातांनी चक्की चालवण्याचा प्रयत्न करा. या योगा अभ्यासाने पोटाशी संबंधित समस्या कमी होतात.