भात (Rice) वेगवेगळ्या पद्धतीने शिजवून प्रत्येक घरांत खाल्ला जातो. यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतंच नाही. (Rice Lovers Beware od Four Side Effects of White Rice) जे लोक डाएट करतात ते भात खाणं कमी करतात किंवा एकदम बंद करतात. ग्रेटर नोएडाच्या एका रुग्णलयातील डायटिशनय आयुषी यादव यांनी पांढरा भात रोज खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात. (Roj bhat ka khau naye) याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What are the side effects of eating too much white rice)
१) डायबिटीसचा धोका वाढतो
पांढरा भात अशा पदार्थांपैकी आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ब्लड शुगर वाढते. परिणामी डायबिटीसचाही धोका वाढतो. म्हणून योग्य प्रमाणात भाताचे सेवन करायला हवे. जेणेकरून डायबिटीसचा धोका टळेल.
बारीक दिसाचंय पण व्यायामाला वेळच नाही? रोज 'इतकी' पाऊलं चाला, पटापट वजन कमी होईल
२) व्हिटामीन्स आणि मिनरल्सची कमतरता
पांढऱ्या भातात इतर पौष्टीक पदार्थांच्या तुलनेत पोषण मुल्य कमी असतात. फायबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्स जे शरीराला योग्य प्रमाणात कार्य करण्यासाठी आवश्यक असतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडं, दात आणि इतर प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ शकते. म्हणूनच भाताच्या तुलेत ज्वारी, बाजरी, गहू, डाळी- कडधान्य जास्त प्रमाणत खाण्याचा सल्ला दिला जातो.
३) वजन वाढू शकते.
सतत भात खाल्ल्याने वजनावर याचा परिणाम दिसून येतो. शरीरात मसल्स कमी आणि चरबी जास्त थुलथुलीत दिसते. अशावेळी पोट स्लिम न दिसता सुटल्यासारखे दिसू शकते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ब्राऊन राईस खा. रात्रीच्यावेळी भात खाण्याऐवजी दुपारी भात खा. जेवणानंतर चालायला जा.
उड्डपीस्टाईल परफेक्ट सांबार घरीच बनेल; 'हा' सिक्रेट मसाला घाला, हॉटेलसारखा टेस्टी इडली-सांबार खा
४) गॅसची समस्या
पांढऱ्या भातात कमी प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. फायबर्स आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे असतात. कारण यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टिम निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही पांढऱ्या भाताचे सेवन करत असाल तर फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेस करा. डाळी, भाज्या, पनीर, शेंगदाणे, सॅलेड जास्त खा.