वजन कमी करण्यसाठी व्यायाम आणि आहाराच्या नियोजनाबरोबरच नॅचरल ड्रिंक्सचा आधार घ्यायला हवा. त्याचा वजन झपाट्यानं कमी होण्यास उपयोग होतो. शरीराच्या इतर भागांचं वजन लवकर कमी होतं पण पोटाची चरबी लवकर कमी होत नाही. ती कमी करण्यसाठी लिंबू आणि गुळापासून तयार होणार्या सरबताचा चांगला उपयोग होतो.गुळामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते . गुळात उष्मांक कमी असतात आणि पचन सुधारण्यास गुळाची मदत होते. गुळामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. म्हणजे गूळ शरीराचं शुध्दीकरणही करतं. गुळामुळे पचनक्रिया गतिशील होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे गुळामुळे वजन नियंत्रित राहातं.
छायाचित्र : गुगल
गुळासोबत जर लिंबाचं सेवन केलं तर त्याचा उपयोग वजन कमी होण्यास होतो. क जीवनसत्त्वयुक्त लिंबानं पचनक्रिया सुधारते. शिवाय पोटावरची चरबीही कमी होते. वजन कमी करण्यासाठी गूळ आणि लिंबाचं एकत्रित सेवन करणं हा आयुर्वेदिक उपाय आहे. रोज गूळ लिंबापासून तयार केलेलं सरबत घेतलं तर वजन लवकर कमी होतं असं वेटलॉस तज्ज्ञ सांगत आहेत.
गूळ-लिंबू आणि वजन
गुळात आणि लिंबात वेगवेगळे आरोग्यदायी घटक आहेत. ज्याचा शरीरास उपयोग होतो. जेवल्यानंतर गुळाचा खडा खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे पचनक्रिया सुधारते. गुळ आणि लिंबापासून तयार केलं जाणारं सरबत शरीरावर जमा झालेली चरबी घटण्यास प्रभावी ठरतं. या सरबतामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आणि शरीर शुध्द होतं.
छायाचित्र : गुगल
कसं तयार करायचं गूळ-लिंबाचं सरबत?
हे सरबत तयार करण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्यावं. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा. त्यात गुळाचा छोटा खडा घालावा. गूळ विरघळेपर्यंत पाणी चांगलं हलवून घ्यावं. हे सरबत रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याचा फायदा होतो असं वेटलॉस तज्ज्ञ सांगतात.