Join us  

व्यायाम करताय, पण खाताय काय? व्यायाम बाजूलाच, चुकीचं खाऊन पचनाच्या तक्रारीच छळतात तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 5:40 PM

व्यायाम सुरु केला आता दणक्यात खावू, तब्येत एकदम फिट करु असं अनेकांच्या मनात असतं, पण व्यायाम राहतो बाजूलाच पचनाच्याच तक्रारी सुरु होतात तेव्हा..

ठळक मुद्देझटपट वेटलॉस डाएट आणि प्रोटीन पावडरींच्या चक्रात सापडलात तर..

राजश्री कुलकर्णी ( M.D.आयुर्वेद)

आता बास झाला आळस, आता आपण फिट व्हायचंच, व्यायाम करायचा. रोज फिरायला जायचं, जमलं तर जीम लावायचं असं अनेकजण ठरवतात. पण व्यायाम सुरु करताना काय लक्षात ठेवायला हवं. एकदम भसकन सुरु केला व्यायाम तर शरीराला मानवेलच असं नाही. त्यामुळे या काही गोष्टी लक्षात ठेवू. व्यायाम एकदम जोशात येऊन सुरु करु नये नाहीतर हात पाय दुखल्याने लगेच बंद पडू शकतो. रोज थोडा थोडा व्यायाम वाढवावा. एकच एक प्रकारचा व्यायाम रोज,सातत्याने करु नये तर शरीराचे सगळे स्नायू,अवयव यांना व्यायाम घडेल असेप्रकार शक्यतो करावेत. जॉगिंग,रनिंग,सायकलिंग, स्कीपिंग,स्वीमिंग हे व्यायाम बदलून बदलून करणं शक्य असल्यास उत्तम ! जीममध्ये जाऊन व्यायाम करत असल्यास तिथेही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम ,सामुग्री वापरून व्यायाम करावेत विविध प्रकारचे व्यायाम केल्यानंतर हृदयाची गती भरपूर वाढते,घाम येतो तश्याच प्रकारे ही गती पुन्हा नियमितहोणं ,रादर नेहमीपेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करणं हे हृदयाचं स्वास्थ्य राखण्यासाठी गरजेची गोष्ट आहे.त्यामुळे आयडियली जलद गतीचे व्यायाम केल्यानंतर योगासनं करणं, अनुलोम विलोम, श्वसनाचे व्यायाम करणं,कपालभाती यांचाही अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीने व्यायाम केल्यास नेहमीपेक्षा अधिक फायदे मिळतात.व्यायाम सुरु असताना आहार हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. डायटचे फॅड मनात ठेवून व्यायाम केल्यास शरीराच्या प्रतिकारशक्ती वर परिणाम होण्याची शक्यता असते. जाहिरातींना भुलून बळी पडतात, पण या कृत्रिम प्रोटीन पावडरी घेऊन खूप उपयोग झाल्याचं दिसून येत नाही कारण त्या पचायला खूप जड असतात. यापेक्षा आपल्या रोजच्या आहारात असे पदार्थ हवेत की जे उत्तम पोषण देतील आणि चांगल्या पद्धतीने पचतील व शक्तीही देतील.

 

व्यायाम सुरु करताना काय आहार घ्याल?

१.  काजू,बदाम,खिसमिस, अक्रोड,पिस्ते,जर्दाळू,खारीक, खोबरं, खजूर या सगळ्या सुक्या मेव्याचा समावेशआहारात करावा.  २. शरीराची ऊब टिकवण्यासाठी यात गूळ, तीळ,खसखस यांचाही वापर करता येईल.नैसर्गिक पोषण मूल्ये,अँटी ऑक्सिडंट्स मिळतील.निसर्गातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ अधिक गुणकारी असतात.३. याखेरीज आहारात गायीचे दूध आणि तूप अवश्य ठेवावे. आहार दिसायला फॅन्सी असण्यापेक्षा आणि उगीचचमहागडा असण्यापेक्षा तो उपयुक्त आणि पौष्टिक असेल याची काळजी घेतली तर त्याचा अधिक फायदा होईल.४. थंडीच्या दिवसांत मिळणारी फळे म्हणजे बोरे,आवळे ,पेरु खावीत. ऊस, हरभरे ,मटार ,ताजी गाजरे, वांगी,वाल, या भाज्यांचा आस्वाद घ्यावा म्हणजे स्वास्थ्य उत्तमप्रकारे टिकून राहते.५. व्यायाम करून आल्यानंतर अंगाला तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल लावून थोडा मसाज करावा मग हरबरा डाळीचे पीठ आणि हळद एकत्र करून ते मिश्रण अंगाला चोळावे म्हणजे घाम,डेड स्किन निघून जाते आणि मग मस्त गरम पाण्याने अंघोळ करून छान फ्रेश व्हावे. नंतर जे खायचे तो आहार घेण्यास हरकत नाही.६. रात्रीचे जेवण लवकर करावे आणि झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडं तूप आणि ड्रायफ्रूट पावडर घालून प्यावे आणि शांत झोपी जावे.७. अशा पद्धतीने आहार आणि व्यायाम यांचा मेळ साधला तर शरीर कमावण्याची, फिट राहण्याची इच्छा आपण नक्की पूर्ण करू शकू.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)www.ayushree.com

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्य