Join us  

तज्ज्ञ म्हणतात, ओट्स खा फिट राहा! सकाळच्या नाश्त्याल ओट्स खाण्याचे 5 हेल्दी फायदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 7:45 PM

नाश्त्यासाठी विविध पदार्थ करता येतात. पण सकाळची घाईची वेळ आणि पोषणाची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन आहारतज्ज्ञ सकाळच्या नाश्त्याला ओट्स, ओट्सचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

ठळक मुद्देओट्स खाल्ल्याने वजन नियंत्रित राहाण्यास , वजन कमी होण्यास मदत होते.ओट्स खाल्ल्याने शरीराची पोषणाची गरज भागते.ओट्स खाल्ल्याने शरीराला मिळणारी ऊर्जा दिवसभर टिकून राहाते.

दिवसभराच्या आहारात सकाळच्या नाश्त्याला आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं स्थान आहे. सकाळचा नाश्ता हा केवळ पोट भरण्यासाठी नसतो तर दिवसाची सुरुवात शरीराला पोषक घटक देऊन आरोग्यदायी करण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नाश्ता रुपी पहिलं पाऊल योग्य उचलण्यासाठी म्हणून  सकाळच्या नाश्त्याला महत्व आहे. नाश्त्यासाठी विविध पदार्थ करता येतात. पण सकाळची घाईची वेळ आणि पोषणाची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन आहारतज्ज्ञ सकाळच्या नाश्त्याला ओट्स, ओट्सचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. सकाळी नाश्त्याल ओट्स खाण्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. ते समजून घेतल्यास सकाळच्या नाश्त्याला ओट्स, ओट्सचे पदार्थ खाण्यचा अजिबात कंटाळा येणार नाही. 

सकाळच्या नाश्त्याला ओट्स कशाला?

ओट्समध्ये फायबर, ॲण्टिऑक्सिडण्टस आणि जीवनसत्वं भरपूर प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ओट्स वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओट्स लाभदायी आहेत. ओट्समध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. सकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने शरीराला यातील ॲण्टिऑक्सिडण्टस शोषून घेण्यास पुरेसा अवधी मिळतो. ओट्समध्ये झिंक, कॅल्शियम, प्रथिनं, लोह, ब, ई जीवनसत्व आणि मॅग्नीज हे घटक भरपूर प्रमाणात असतात. नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने ह्रदयाचं आरोग्य निरोगी राहातं, वजन कमी होतं/ नियंत्रित राहातं आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. 

1. ओट्स खाल्ल्याने वजन नियंत्रित राहाण्यास , वजन कमी होण्यास मदत होते.ओट्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ओट्स खाल्ल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. सकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ले की सारखी भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्यास तज्ज्ञ सकाळच्या नाश्त्याला ओट्स, ओट्सचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. 

Image: Google

2. तज्ज्ञ सांगतात ओट्स सकाळी नाश्त्यालाच खावेत. ओट्समुळे पचनक्रिया व्यवस्थित राहाते. पोटात गॅसेस होत नाही. बध्दकोष्ठताही होत नाही. ओट्समधील फायबर या घटकामुळे पोट स्वच्च राहाण्यास मदत होते. ओट्समुळे आतडेही स्वच्छ राहातात.

3. सकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्राॅलचं प्रमाण कमी होतं. तसेच ओट्समधील ओमेगा 3 या फॅटी ॲसिडमुळे ह्दयाचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. 

Image: Google

4. ओट्समध्ये जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे ओट्स खाल्ल्याने शरीराची पोषणाची गरज भागते. ओट्समध्ये बीटा  ग्लूकल हा घटक असतो. त्याचा फायदा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होतो. 

5. ओट्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, ब जीवनसत्व  हे घटक  असतात. हे घटक शरीराला ऊर्जा प्रदान करतात. ओट्स खाल्ल्याने शरीराला मिळणारी ऊर्जा दिवसभर टिकून राहाते. ओट्समुळे रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रित राहातं. बॅड कोलेस्ट्राॅल, मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी, मधुमेह असल्यास तो नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी नाश्त्याल ओट्स खाण्याने फायदा होतो. 

टॅग्स :आहार योजनाअन्नआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स