अलीकडे मीरा कपूर तिचा फिटनेस आणि जीवनशैलीमुळे बरीच चर्चेत असते. मीरा दररोज तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फिटनेस टिप्स शेअर करत राहते आणि लाखो लोकांचे लक्ष वेधून घेते. २ मुलांची आई असलेली मीरा फिटनेसच्याबाबतीत लोकांसाठी प्रेरणा बनली आहे. वर्कआउट्स व्यतिरिक्त मीरा काही वेळा खाण्या -पिण्याच्या टिप्सही आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. पूर्वी तिनं गिलोय आणि गुलकंदचा उल्लेख केला होता आणि आता तिनं तिच्या हेल्दी ड्रिंकबाबत माहिती दिली आहे. हे पेय मीराच्या फिटनेसचं सिक्रेट आहे.
मीराला आवडतो कोहळा ज्यूस
शाहिदच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवर कोहळ्याच्या ज्यूसचे फोटो शेअर केले आहेत. जो निरोगी आणि नैसर्गिक आहे. कोहळ्याचा ज्यूस एका प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक आहे. याची भाजी बनवल्यासही अप्रतिम चव लागते. या ज्यूसचे सेवन केल्यानं शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो कोहळा
डॉक्टरांच्या मते पेठ्यात कमी कॅलरीज आणि मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे जास्तीत जास्तवेळ पोट भरल्याप्रमाणं वाटतं. त्यामुळे ओव्हरइंटिंग थांबवता येऊ शकतं. पेठ्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
हायड्रेट राहायला मदत होते
कोहळ्याच्या रसात पोटॅशियम असते जे एक चांगले ड्यूरेटीक आहे. याच्या सेवनानं शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. सकाळच्यावेळी पेठ्याचा रस प्यायल्यानं अनेक प्रकारच्यां आजारांपासून लांब राहता येऊ शकतं.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात
पोषणतज्ञ आणि आरोग्य प्रशिक्षकांचा असा विश्वास आहे की दररोज सकाळी एक पेला ताज्या कोहळ्याचा रस प्यायल्यानं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यासह पचनक्रिया योग्य राहते आणि चयापचय देखील वाढते. अशा स्थितीत एसिडिटी आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.
पोषक तत्वांनी भरपूर
प्रथिनेयुक्त कोहळ्यात विविध प्रकारची पोषक द्रव्ये आढळतात. हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक समृद्ध आहे. यातील पोषक घटक शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतात आणि आपल्याला रोगांपासून वाचवतात.
असा तयार करा कोहळ्याचा रस
सगळ्यात आधी कोहळ्याचे काप करून घ्या. आतील बिया न विसरता काढा.
नंतर कोहोळ्याचे काप मिक्सरमधून फिरवून घ्या.
रस तयार झाल्यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीनं किंवा गाळणीनं एका ग्लासात गाळून घ्या आणि रिकाम्यापोटी या ज्यूसचे सेवन करा.