Join us  

सायंकाळी एकदम थकवा येतो, डाऊन वाटतं? दिवसभर एनर्जी टिकायला हवी तर खा ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 6:48 PM

Fitness tips: थोडंसं जास्त काम झालं, जरा दगदग झाली की लगेच थकून जाता? मग नक्कीच तुमच्या शरीरात या काही घटकांची कमतरता (deficiency of healthy food) आहे हे लक्षात घ्या ..

ठळक मुद्देया पदार्थांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यात निश्चितच मदत होईल. 

आपलं रोजचं रुटीन सांभाळता सांभाळता अनेक जणींच्या नाकीनऊ येतात.. नेहमीपेक्षा थोडं जरी जास्तीचं काम अंगावर आलं तरी अगदी थकल्यासारखं होतं.. खूप खूप अशक्तपणा (weakness) आल्यासारखं वाटतं.. असंच तुमचंही होत असेल तर याचा अर्थ तुमची एनर्जी लेव्हल खूप झपाट्याने कमी होत चालली आहे..

 

सतत येणारा थकवा, दगदग हे आरोग्याच्या दृष्टीने बरं लक्षण नाही. जर तुमच्यातली उर्जा कमी पडत असेल, तर आहारात काही तरी कमी पडतंय जे आपली रोजची गरज भागवू शकत नाही. त्यामुळेच सुरुवातीला हा त्रास कमी करायचा असेल तर आहारात थोडा बदल करा आणि हे काही पदार्थ आवर्जून नियमितपणे खात रहा.. या पदार्थांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे तुमची एनर्जी लेव्हल (energy level) वाढण्यात निश्चितच मदत होईल. 

 

१. केळीगरीबांचं सुपरफूड म्हणून केळी ओळखली जाते. कारण केळीमध्ये खूप जास्त पौष्टिक घटक असतात. रोजच्या नाश्त्यात एक केळ नियमितपणे खाल्लं तरी तुमच्या एनर्जी लेव्हलमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येतो. केळी खाल्ल्यांमुळे स्नायुंना बळकटी मिळते. केळीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने थकवा, अशक्तपणा दूर होतो. केळीमधले कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरते. 

 

२. रताळेरताळी अतिशय पौष्टिक आणि उर्जादायी मानली जातात. त्यामुळे आपल्याकडे उपवासाच्या दिवशीही रताळी खातात. रताळ्यांमध्ये झिंक आणि ॲण्टिऑक्सिडंट्स, प्रोटीन्स, स्टार्च, व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील उर्जेची पातळी वाढविण्यासाठी रताळे मदत करतात. 

 

३. सुकामेवा रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. ओमेगा ३ फॅटी ॲसिडदेखील असते. यामुळे उर्जेचा स्तर वाढतो. तसेच सुकामेव्यात असणारे पॉलिफेनॉल हा उर्जेचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि आरोग्याला खूप चांगले लाभ मिळतात. 

 

४. मोड आलेली कडधान्येअनेकदा भाज्या, फळं आपण रोज खातो, पण मोड आलेली कडधान्ये खायला मात्र विसरतो. पण एनर्जी लेव्हल कमी होत आहे, असं जाणवत असेल तर मोड आलेली कडधान्ये खाण्यास मात्र विसरू नका. कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. सॅलड किंवा कोशिंबीर करून कडधान्ये खाल्ली तरी चालतात. पण ज्यांना पचनाचा त्रास असेल, त्यांनी उसळ करून कडधान्ये खावीत. आठवड्यातून दोन वेळा तरी कडधान्ये खायला पाहिजेत. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स