Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नवरात्रीच्या उपवासाने थकवा आला? बघा ४ प्रकारचे एनर्जी ड्रिंक... चटकन वाटेल फ्रेश आणि थकवा गायब

नवरात्रीच्या उपवासाने थकवा आला? बघा ४ प्रकारचे एनर्जी ड्रिंक... चटकन वाटेल फ्रेश आणि थकवा गायब

Energy Drinks For Fast: उपवास करून खूपच थकवा आला असेल, ॲसिडिटी वाढल्यासारखी होत असेल, तर हे काही एनर्जी ड्रिंक घ्या. यामुळे नक्कीच थकवा (feeling tired) कमी होण्यास मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 08:09 AM2022-09-30T08:09:29+5:302022-09-30T08:10:01+5:30

Energy Drinks For Fast: उपवास करून खूपच थकवा आला असेल, ॲसिडिटी वाढल्यासारखी होत असेल, तर हे काही एनर्जी ड्रिंक घ्या. यामुळे नक्कीच थकवा (feeling tired) कमी होण्यास मदत होईल.

Feeling tired because of navratri fast? 4 types of energy drinks, that will surely boost your stamina | नवरात्रीच्या उपवासाने थकवा आला? बघा ४ प्रकारचे एनर्जी ड्रिंक... चटकन वाटेल फ्रेश आणि थकवा गायब

नवरात्रीच्या उपवासाने थकवा आला? बघा ४ प्रकारचे एनर्जी ड्रिंक... चटकन वाटेल फ्रेश आणि थकवा गायब

Highlights ही काही सरबते उपवासाच्या दिवसांत आवर्जून घ्या. ती खरोखरच एखाद्या एनर्जी ड्रिंकप्रमाणे काम करतात. त्यामुळे अंगातली ताकद टिकून राहण्यास मदत होते. 

बऱ्याच जणांना नवरात्रीचे उपवास (navratri fast) असतात. पहिल्या माळेला सुरू झालेला उपवास थेट नवमी किंवा दसऱ्याला सुटतो. सलग नऊ दिवस उपवास करणे खरोखरच कठीण असते. कारण शरीराला रोज रोजच अशा पद्धतीचा आहार घेण्याची सवय नसते. त्यात उपवास आणि घरचे- ऑफिसचे काम हे सगळं सांभाळताना अनेकींची खूपच धावपळ होते. थकवा येतो. एनर्जी पुरत नाही. म्हणूनच ही काही सरबते उपवासाच्या दिवसांत आवर्जून घ्या. ती खरोखरच एखाद्या एनर्जी ड्रिंकप्रमाणे (energy drink) काम करतात. त्यामुळे अंगातली ताकद (how to boost stamina during fast?) टिकून राहण्यास मदत होते. 

 

उपवासाच्या दिवसांत घ्यायला पाहिजेत अशी पेयं...
१. ताक 

ताक हे खूप पौष्टिक आणि एनर्जी देणारं आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवसांत दुपारच्या वेळी ताक आवर्जून प्या.

स्वत: नाचतेय आणि चक्क म्हशीलाही नाचायला लावतेय, बघा हा मजेशीर व्हायरल व्हिडिओ

ताक करताना त्यात मीठ आणि शुगरचा त्रास नसल्यास थोडीशी साखरदेखील टाका. उपवासाच्या दिवसांत बऱ्याचदा बीपी आणि शुगर कमी होते. मीठ आणि साखर यामुळे बीपी आणि शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

२. लिंबूवर्गीय फळांचा रस
लिंबू सरबत तर सोपे आणि भरपूर उर्जा देणारे आहेच. पण रोज रोज लिंबू सरबत पिण्याचा कंटाळा येत असेल तर मोसंबी, संत्री अशा लिंबूवर्गीय फळांचा रस घ्या.

वजन आणि पोट दोन्ही कमी करायचंय? फ्लटर किक मारा, निवांत झोपून करण्याचा भन्नाट व्यायाम

कारण या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. शिवाय त्यांच्यातली वॉटर लेव्हलही चांगली असते. त्यामुळे उपवास करताना डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

 

३. काकडीची स्मूदी
काकडीची सालं काढून घ्या. त्याचे तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये टाका. त्यात अर्धे लिंबू पिळा.

नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

चिमुटभर मीठ आणि थोडीशी साखर टाका. हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात बर्फाचा खडा आणि थोडं पाणी टाका. उपवासाला चालत असल्यास जिरेपूडही टाका. डिहायड्रेशन होणार नाही.

 

४. ड्रायफ्रूट शेक
२ अंजीर, २ खजूर पाण्यात २ तास भिजत घाला. बदाम, अक्रोड, पिस्ते, काजू, मनुका असं सगळं समप्रमाणात घ्या.

नवरात्र स्पेशल हिरवी चटकदार चटणी, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात झटपट खास रेसिपी

भिजवलेले अंजीर, खजूर आणि सगळा सुकामेवा मिक्सरमध्ये टाका. त्यात २ कप दूध टाका. २ बर्फाचे तुकडे टाका. हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं की भरपूर उर्जा देणारा ड्रायफ्रुट शेक झाला तयार. 

 

Web Title: Feeling tired because of navratri fast? 4 types of energy drinks, that will surely boost your stamina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.