Join us  

खूप जास्त खाणं झाल्यामुळे अस्वस्थ वाटतं आहे? मग हा सोपा उपाय करून पहा, एकदम हलकं वाटेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 5:01 PM

एखादा पदार्थ खूपच आवडला तर त्याच्यावर यथेच्छ ताव मारला जातो. अगदी भरपेट जेवण केले जाते. पण नंतर मात्र पोटाचे सगळेच गणित बिघडते आणि अस्वस्थ होऊ लागते. अशा वेळी मग काय करावं बरं ?

ठळक मुद्देगरजेपेक्षा जास्त जेवण झालं असेल, तर अस्वस्थता दूर करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पहा

सणासुदीचं जेवण किंवा मित्रमंडळी, नातलग असे सगळे मिळून केलेली पार्टी म्हणजे एकप्रकारे पोटावर अत्याचार. गप्पांच्या नादात, हसण्या- खिदळण्यात आणि एकमेकांना आग्रह करत करत हमखास दोन- चार घास जास्त खाल्ले जातात. कधी कधी एखादा पदार्थ इतका भन्नाट आवडून जातो की पोट अगदी तुडूंब भरलं तरी जिभेचे समाधान होत नाही. अशावेळी मग पोटावर अन्याय करत आपण जिभेच्या इशाऱ्याने वागतो खरे... पण नंतर मात्र या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो. 

 

अशा वेळी पोट इतकं गच्च झालेलं असतं की अक्षरश: आपण अस्वस्थ होऊन जातो. काय करावे ते अजिबातच सूचत नाही. पण या सगळ्या गोष्टींवर काही घरगुती इलाज नक्की करता येतात आणि त्याचा परिणामही फार पटकन दिसून येतो. काही साध्या- सोप्या गोष्टी करून पाहिल्या तर निश्चितच आराम मिळतो आणि अस्वस्थता दूर होऊन एकदम हलकं वाटू लागतं.

 

गरजेपेक्षा जास्त जेवण झालं असेल, तर अस्वस्थता दूर करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पहा१. कोमट पाणी प्याबऱ्याचदा एवढं भरपेट जेवण झालेलं असतं की अगदी पाण्याचा घोट घ्यायला देखील पोटात जागा नसते. मग अशावेळी एखादा ग्लास कोमट पाणी कसं प्यायचं, असा प्रश्न काही जणांना पडू शकताे. पण पोटाची अस्वस्थता दूर करण्यासाठी कोमट पाणी पिणं खूप फायद्याचं आहे. कोमट पाणी पिल्यामुळे मंदावलेली पचनसंस्था पुन्हा ॲक्टीव्हली काम करू लागते. कोमट पाणी प्यायल्यामुळे ॲसिडीटी, अपचन असे संभाव्य त्रास दूर होतात आणि पुढच्या काही वेळातच फ्रेश वाटू लागतं.

 

२. अजिबात झोपू नकाभरपेट जेवण झाल्यावर साहजिकच डोळे जड पडतात आणि प्रचंड झोप येऊ लागते. पण अशा अस्वस्थ अवस्थेत तुम्ही झोपलात, तर त्याच्यामुळे पचन संस्थेच्या कामात निश्चितच अडथळा येऊ शकतो आणि आपल्याला अपचन, ॲसिडीटी असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे भरपेट जेवण झाल्यावर कितीही झोपावं वाटत असेल तरी झोपू नका. झोपल्यामुळे अस्वस्थता दूर होईल, असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. थोडेसे हळूवार चाला. अशावेळी जास्त जारोत चालल्यानेही त्रास होऊ शकतो.

 

३. काकडी खाभरपेट जेवणामुळे आलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी काकडी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर पोटात गेल्यास ते पचनास मदत करतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने एखादी मध्यम आकाराची काकडी खावी. यामुळे अस्वस्थता दूर होऊन हलके- हलके वाटू लागेल.

 

४. लिंबू पाणी प्यालिंबू पाणी पिणे हा पचनाचा कोणताही त्रास दूर करण्यासाठीचा अत्यंत सोपा उपाय आहे. भरपेट जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट लिंबू पाणी घेतले तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. लिंबू पाणी पिताना त्यामध्ये काळेमीठ टाका. ते जास्त फायदेशीर ठरते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सपौष्टिक आहारहेल्थ टिप्स