सध्या वाढते वजन ही एक कॉमन समस्या झाली आहे. सतत वाढत जाणारे वजन कमी कसे करायचे यासाठी सर्वचजण प्रयत्नांत असतात. एक्सरसाइज आणि योग्य डाएट करुन वजन कमी करता येते. परंतु काहीवेळा एक्सरसाइज आणि डाएट करूनही वजन कमी होत नाही याच मुख्य कारण म्हणजे मेटाबॉलिझम रेट कमी असणे. मेटाबॉलिझम म्हणजे अन्नाला ऊर्जामध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया. त्यामुळे ज्यांचा मेटाबॉलिझम चांगला आणि वेगवान असेल, तो नेहमी तंदुरुस्त असतो. अशी व्यक्ती जड अन्नपदार्थ देखील अगदी काही वेळात सहज पचवू शकते. परंतु, जर एखाद्याचा मेटाबॉलिझम वेग कमी असेल तर त्याची अन्नपदार्थ पचवायच्या क्षमतेचा वेग हा कमी असतो असे म्हणतात की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेटाबॉलिझम वेगवान असावे लागते. यासाठीच आपले वजन झटपट कमी करण्यासाठी आपण मेटाबॉलिझमचा वेग वाढवण्यासाठी अनेक उपाय करुन पाहतो(Drinks to Boost Your Slow Metabolism Naturally).
वाढणारे वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिझम वेगवान असणे गरजेचे असते. यासाठीच मेटाबॉलिझम वेगवान करण्यासाठी आपल्याला रोजच्या डाएटमध्ये थोडे बदल करणे गरजेचे आहे. वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज, डाएट आणि नेहमीच्या चहा, कॉफी ऐवजी आपण बडीशेप आणि ओव्याचा हेल्दी चहा पिऊ शकतो. डाएटिशियन मनप्रीत कालरा यांच्या मते, वजन कमी करण्याबरोबरच मेटाबॉलिझम वेगवान करण्यासाठी बडीशेप आणि ओव्याचा हेल्दी चहा पिणे आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. मेटाबॉलिझम वेगवान करण्यासाठी उपयुक्त ठरणारा चहा कसा तयार करायचा व त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात(Fennel & Ajwain Seeds Tea Benefits To Increase Metabolism).
बडीशेप ओव्याचा चहा करण्यासाठी लागणारे साहित्य...
१. मेथी दाणे - १/२ टेबलस्पून
२. बडीशेप - १/२ टेबलस्पून
३. ओवा - १/२ टेबलस्पून
४. धणे - १/२ टेबलस्पून
५. मध - चवीनुसार
६. लिंबाचा रस - चवीनुसार
७. पाणी - १ ग्लास
ओव्हरवेट आहात म्हणून काय झालं ? करा ५ एक्सरसाइज, दिसाल फिट आणि तंदुरुस्त...
५ पोटभरीचे पौष्टिक पर्याय, पोट तर भरेल - वजनही वाढणार नाही, भूक भूकही होत नाही...
बडीशेप ओव्याचा चहा कसा करायचा ?
१. मेथी दाणे, बडीशेप, ओवा, धणे एक ग्लासभर पाण्यांत रात्रभर भिजत ठेवून द्यावेत.
२. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी एका पॅनमध्ये घेऊन १ ते २ मिनिटांसाठी हलके गरम करुन घ्यावे.
३. आता हे पाणी न गाळता एका ग्लासात ओतून घ्यावे त्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस आणि मध घालावे.
डाएटिशियन मनप्रीत कालरा यांच्या मते, रोज सकाळी उपाशी पोटी हा चहा प्यायल्याने मेटाबॉलिझमचा वेग वाढून सतत वाढत जाणारे वजन कमी होण्यास मदत मिळते.