Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटीपोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? सकाळी रिकाम्या पोटी करा १ उपाय, पोट कमी होईल-स्लिम दिसाल

ओटीपोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? सकाळी रिकाम्या पोटी करा १ उपाय, पोट कमी होईल-स्लिम दिसाल

Fennel seeds For Weight Loss : बडिशेपेचं पाणी प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होते.  वजन वेगाने कमी करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:00 PM2024-01-30T13:00:47+5:302024-01-30T16:09:45+5:30

Fennel seeds For Weight Loss : बडिशेपेचं पाणी प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होते.  वजन वेगाने कमी करता येते.

Fennel seeds For Weight Loss : Fennel Water For Weight Loss How to Make Weight Loss Drink | ओटीपोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? सकाळी रिकाम्या पोटी करा १ उपाय, पोट कमी होईल-स्लिम दिसाल

ओटीपोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? सकाळी रिकाम्या पोटी करा १ उपाय, पोट कमी होईल-स्लिम दिसाल

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये आणि डाएटमध्ये बदल करावे लागतील. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी तुम्ही बडीशेपेच्या पाण्याचा आहारात समावेश करू शकता. (How to Make Fennel Tea For Weight Loss) बडिशेप हा असा मसालायुक्त पदार्थ आहे ज्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. बडिशेपेच्या पाण्याचे सेवन केल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने वाढतो. (Vajan kami karnyache upay sanga)खासकरून जेव्हा रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन केले जाते तेव्हा मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते. बडिशेपाच्या बिया फायबर्सचा एक समृद्ध स्त्रोत आहे. बडिशेपेचं पाणी प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होते.  वजन वेगाने कमी करता येते. (Fennel seeds For Weight Loss)

फार्मइजच्या रिपोर्टनुसार बडिशेपेत व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, व्हिटामीन के असते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, सेलेनियम, आणि आयर्न आणि फायबर्स असतात. या पाण्याच्या सेवनाने ब्लड डिटॉक्स होण्यास मदत होते. पचनाच्या समस्या उद्भवत नाही याशिवाय पटकन वजन कमी होण्यास मदत होते. (Fennel Seeds For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी बडिशेपेचं पाणी कसे फायदेशीर ठरते? (How Fennel Seeds Help With Weight Loss)

बडिशेपेत फॉस्फरेस,  सेलेनियम,  जिंक, मॅन्गनीज यांसारखे एंटी ऑक्सिडेंट्स असतात. एंटीऑक्सिडेंट्स शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. फ्रि रेडिकल्स ऑक्सिडेट्विह ताण  निर्माण करते. ऑक्सिडेटिव्ह ताण लठ्ठपणाचे कारण ठरू शकतो. यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते. शरीरातील व्हिटामीन्स मिनरर्ल्सचे अवशोषण सुधारून फॅट स्टोरेज कमी करण्यास मदत होते. बडिशेप एक डिटॉक्सिफायरप्रमाणे काम करते. बडिशेपचे पाणी विषारी पदार्थ काढून टाकण्यास फायदेशीर ठरते. 

बडिशेपेचं पाणी तब्येतीसाठी अनेकदृष्ट्या फायदेशरी ठरते. हे पाणी तयार करण्यासाठी  तुम्हाला २  पदार्थ लागतील.  सगळ्यात आधी १ चमचा बडिशेप आणि १ ग्लास पाण्यात मिसळून रात्रभर भिजवायला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी बडिशेपेचं पाणी तयार असेल. हे पाणी गाळून याचे सेवन करा.

बडिशेपेचा आहारात समावेश कसा करावा? (Easy Ways Eat Fennel Seeds)

एका कढईत बडिशेप गरम करून घ्या.  थंड झाल्यानंतर पावडर बनवून घ्या.  ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड हे पदार्थ एकत्र मिसळा. हे पदार्थ तुम्ही सॅलेडबरोबर खाऊ शकता.  पाणी गरम करून त्यात आलं घालताना बडिशेपेचे दाणे घालू शकता. हे व्यवस्थित उकळवून घ्या. यामुळे चहाला चव येईल आणि गुणकारी ठरेल. अनेकजण जेवण झाल्यानंतर बडिशेप खातात ही सवयसुद्धा पचनाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.  सूपमध्ये सुद्धा तुम्ही बडिशेपेची पावडर घालू शकता.

Web Title: Fennel seeds For Weight Loss : Fennel Water For Weight Loss How to Make Weight Loss Drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.