Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कंबर दुखते-गुघड्यांच्या वेदनाही वाढल्या? कॅल्शियमयुक्त घरगुती लाडू खा; हाडं होतील मजबूत

कंबर दुखते-गुघड्यांच्या वेदनाही वाढल्या? कॅल्शियमयुक्त घरगुती लाडू खा; हाडं होतील मजबूत

Calcium Booster Laddu : तुम्ही कॅल्शियमची कमरता भरून काढू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 08:55 PM2024-08-21T20:55:38+5:302024-08-22T17:38:13+5:30

Calcium Booster Laddu : तुम्ही कॅल्शियमची कमरता भरून काढू शकता.

Figs And Dates Laddu Will Give Life To Bones And Also Provide Relief If Pcod Know How To Make Ladoo | कंबर दुखते-गुघड्यांच्या वेदनाही वाढल्या? कॅल्शियमयुक्त घरगुती लाडू खा; हाडं होतील मजबूत

कंबर दुखते-गुघड्यांच्या वेदनाही वाढल्या? कॅल्शियमयुक्त घरगुती लाडू खा; हाडं होतील मजबूत

हाडांमध्ये वेदना (Bones Pain) झाल्यास याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता आहे. अशा स्थितीत काही औषधांचा आहारात समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमरता  भरून काढू शकता. रोज तुम्ही अंजीर, खजूर यापासून बनवलेल्या लाडूचे सेवन केले तर हाडं मजबूत राहण्यास मदत होईल. इतकंच नाही तर हा एक लाडू जरी खाल्ला तरी पीसीओडीची समस्या उद्भवत नाही. अंजीर आणि खजूर हे दोन्ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. (Figs And Dates Laddu Will Give Life To Bones And Also Provide Relief If Pcod Know How To Make Ladoo)

फेब्लो.इनच्या रिपोर्टनुसार 30 ग्राम अंजीरमध्ये  68k कॅलरीज आणि १.१ ग्रॅम प्रोटीन असते. यात कार्बोहायड्रेट्स देखिल असतात. याशिवाय अंजिरमध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते.  रात्रीच्यावेळी २ ते ३ अंजीर भिजवून सकाळी खाल्ल्यास त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात. (Calcium Booster Anjeer Laddu)
 

अंजीर आणि खजूराचे लाडू कसे बनवायचे ते समजू घेऊया

१ कप सुकलेले अंजीर, १ कप खजूर, १ मोठे चमचे तूप, अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड, २ मोठे चमचे भोपळ्याच्या बीया, २ चमचे टरबूजाच्या बीया, २ मोठे चमचे सुर्यफुलाच्या बीया, अर्धा  कप सुकं खोबरं,  अर्धा चमचा वेलची पावडर.

जरा तिखट खाल्लं की पोटात जळजळ होते? 'हा' पदार्थ खा, जळजळ दूर होईल-पोट पटकन साफ होईल

अंजिराचे लाडू करण्याची सोपी पद्धत

1) अंजिराचे लाडू करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात अंजीर आणि खजूराचे पाणी भिजवून ठेवा. सकाळी उठून खजूराच्या बीया काढून घ्या. त्यानंतर  अंजिर आणि खजूर मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्या. 

२) गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवा त्यात २ मोठे चमचे तूप घाला तूप. तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप गूळ घाला आणि गूळ हळूहळू वितळण्याची वाट पाहा. 

३) गॅस ऑन करून घ्या त्यावर पॅन ठेवा त्यात अर्धा कप तूप घाला. त्यानंतर एक कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड, २ चमचे भोपळ्याच्या बीया, २ चमचे टरबूजाच्या बीया, २ चमचे सुर्यफुलांच्या बीया आणि अर्धा कप सुकलेलं नारळ घालून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. 

ना डाएटची झंझट, ना व्यायाम; खुर्चीवर बसून १० मिनिटांचा व्यायाम, डायबिटीस-वजन दोन्ही कंट्रोलमध्ये राहील

४) नंतर अंजिर आणि खजूराचे मिश्रण गुळाच्या पॅनमध्ये घाला नंतर या मिश्रणात ड्रायफ्रुट्सचे मिश्रण घाला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून  व्यवस्थित मिसळा. जेव्हा मिश्रण हलकं थंड होईल तेव्हा हाताने गोलाकार लाडू वळून घ्या. थंड झाल्यानंतर लाडू खायला तयार असतील.

Web Title: Figs And Dates Laddu Will Give Life To Bones And Also Provide Relief If Pcod Know How To Make Ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.