Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कितीही योग्य आहार घेतला तरी वजन कमी का होत नाही? जाणून घ्या.

कितीही योग्य आहार घेतला तरी वजन कमी का होत नाही? जाणून घ्या.

Find Out Why You Can't Lose Weight : सगळे प्रयत्न करूनसुद्धा वजन कमी का होत नाही जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2025 19:09 IST2025-01-12T19:05:51+5:302025-01-12T19:09:04+5:30

Find Out Why You Can't Lose Weight : सगळे प्रयत्न करूनसुद्धा वजन कमी का होत नाही जाणून घ्या.

Find Out Why You Can't Lose Weight | कितीही योग्य आहार घेतला तरी वजन कमी का होत नाही? जाणून घ्या.

कितीही योग्य आहार घेतला तरी वजन कमी का होत नाही? जाणून घ्या.

आपण सतत बघत असतो की एखादा स्थूल व्यक्ती दिसला की बरेच जण संवादाची सुरुवात वजन किती वाढलं आहे? या वाक्यापासून करतात.(Find Out Why You Can't Lose Weight ) पण एखाद्या माणसाला जेव्हा आपण सातत्याने त्याच्या शरीराच्या स्थूलतेची जाणीव करून देत असतो. तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करायचे काम आपण करतो.(Find Out Why You Can't Lose Weight ) एखाद्याला स्वास्थ्य विषयी जागृत करणे नक्कीच चांगले आहे.पण आपली बोलण्याची पद्धत  बरेचदा चुकते. त्यामुळे ती व्यक्तीही निराश होते.

मारीसा पिअर ही जगभरात नावाजलेली उपचारतज्ज्ञ आहे. ती लोकांशी बोलून त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून एखाद्या रोगाशी सामना करण्याचे धैर्य देते. बेस्ट सेलर लेखकांपैकी एक आहे. तिने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, वजन कमी करताना मोठमोठे शब्द वापरणं आणि वजन कमी करणं म्हणजे काहीतरी फार कठीण किंवा मोठी गोष्ट आहे, असं मानणं बंद करा. काही सवयींना रोजच्या दिनचर्येचा भाग बनवा. स्वत:ला अतिबंधन लादणे बंद करा.   
 


ती म्हणते, आधी वेट लॉस म्हणणं बंद करा. मुळात भीती वाटायला सुरुवात त्या शब्दापासूनच होते. डाईटिंगचा फेल्युअर रेट ९२% आहे. जेव्हा तुम्ही मेंदूला काही कमी करायचे आहे किंवा गमवायचे आहे या अर्थाने सांगता तेव्हा मेंदू कार्यक्षम राहात नाही. जगात सगळ्याच जास्त मृत्यु दर वजनामुळे नाही तर उपासमारीमुळे आहे. शरीराला त्रास देऊन आणि मन मारून कोणाच भलं होत नाही. वजन कमी करणे नक्कीच गरजेचे आहे. पण दृष्टिकोन बदला. शरीर रचना प्रत्येकाची वेगवेगळी असते. स्वत:च्या शरीराबद्दल जाणून घ्या. एखाद्यासाठी जर आहारात बदल करणं फायदेशीर ठरते. तर तेच बदल तुमच्यासाठीही फायदेशीरच असतील असे नाही. शरीराचा समतोल राखता आला पाहिजे. एखादा बदल मेंदू लगेच आत्मसात करत नाही त्याला वेळ लागतो. जो देणं गरजेच आहे. समजा तुम्ही कॉफी साखरेशिवाय पिण्याचे ठरवलेत. पण दहा- पंधरा दिवसांनी सुद्धा साखरेशिवाय पितांना आवडत नाही. मग थोडी साखर जरूर घ्या. बाकी ठिकाणी गोड खाऊ नका. मन मारून जगणं हा उपाय योग्य नाही.     

Web Title: Find Out Why You Can't Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.