आपण सतत बघत असतो की एखादा स्थूल व्यक्ती दिसला की बरेच जण संवादाची सुरुवात वजन किती वाढलं आहे? या वाक्यापासून करतात.(Find Out Why You Can't Lose Weight ) पण एखाद्या माणसाला जेव्हा आपण सातत्याने त्याच्या शरीराच्या स्थूलतेची जाणीव करून देत असतो. तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करायचे काम आपण करतो.(Find Out Why You Can't Lose Weight ) एखाद्याला स्वास्थ्य विषयी जागृत करणे नक्कीच चांगले आहे.पण आपली बोलण्याची पद्धत बरेचदा चुकते. त्यामुळे ती व्यक्तीही निराश होते.
मारीसा पिअर ही जगभरात नावाजलेली उपचारतज्ज्ञ आहे. ती लोकांशी बोलून त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून एखाद्या रोगाशी सामना करण्याचे धैर्य देते. बेस्ट सेलर लेखकांपैकी एक आहे. तिने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, वजन कमी करताना मोठमोठे शब्द वापरणं आणि वजन कमी करणं म्हणजे काहीतरी फार कठीण किंवा मोठी गोष्ट आहे, असं मानणं बंद करा. काही सवयींना रोजच्या दिनचर्येचा भाग बनवा. स्वत:ला अतिबंधन लादणे बंद करा.