Belly Fat Reduce Tips : वेगवेगळ्या कारणांनी वजन वाढणं आजकाल अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. जास्तीत जास्त लोक शरीरात वाढत असलेल्या चरबीमुळे आणि त्यानंतर होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे चिंतेत आहेत. कारण एकदा का वजन वाढल्यावर शरीर तर बेढब दिसतंच, सोबतच वेगवेगळे आजारही शरीरात घर करतात. पोटावर वाढत असलेल्या चरबीमुळे महिला अधिक वैतागलेल्या असतात.
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात जसे की, पायी चालणे, फिजिकल अॅक्टिविटी करणं, आहारात बदल करणं, फास्ट फूड खाणं सोडणं इत्यादी. पण इतकं करूनही वजन सहजपणे कमी होणं जरा अवघडच असतं. अनेकांना वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अशात फिटनेस कोड सोनिया हुडानं वजन कमी करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
वजन कमी करण्यासाठी काय करावं?
सोनिया हुडानं आपल्या इन्स्टा रीलमध्ये पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तीन सोपे उपाय सांगितले आहेत. सोनियानं सांगितलं की, या टिप्स फॉलो कराल तर तुम्हाला लगेच फरक दिसून येईल. अशात पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय करावं हे जाणून घेऊ.
जास्त घाई ठरू शकते समस्या
सोनियानं सांगितलं की, शरीरात वाढलेली चरबी कमी करणं सोपं नाही. पण त्याकडे फार अवघड पद्धतीनं बघू नका. वजन कमी करण्यासाठी खूप जास्त स्ट्रिक्ट डाइट फॉलो करने किंवा फार जास्त एक्सरसाईज करण्याची गरज नाही. शांतपणे आणि शरीराचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं वजन कमी करायला हवं.
एनर्जी आणि फॅट लॉस ड्रिंक
सोनियानं सांगितलं की, जर तुम्हाला लवकर आणि योग्य पद्धतीनं वजन कमी करायचं असेल तर दिवसाची सुरूवात एनर्जी किंवा फॅट लॉस ड्रिंकनं केली पाहिजे. म्हणजे तुम्ही सकाळी उपाशीपोटी ग्रीन टी, तूप आणि कॉफी ड्रिंक किंवा एल कार्निटिन घेऊ शकता.
मेटाबॉलिज्म बूस्ट करणारे फूड्स
दिवसभरात तुम्ही जे काही खात असाल त्याबाबत अशी काळजी घ्या की, त्यातून तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतील. मेटाबॉलिज्मची वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होईल तर वेगानं वजन कमी करू शकाल.
कार्डियो आणि वेट ट्रेनिंग
केवळ कोणतीही एक एक्सरसाईज करून वजन कधीच कमी होणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की, फक्त कार्डियो करून किंवा वेट ट्रेनिंग करून वजन कमी होईल तर हे जरा अवघड आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करावं लागेल, तेव्हाच चांगला रिझल्ट मिळू शकेल. यासाठी आधी कार्डियो करा आणि नंतर वेळ मिळेल तसं वेट ट्रेनिंग करा.