बॉलीवूड सेलिब्रिटींचं सौंदर्य, लूक्स, फॅशन आणि फिटनेस यांची नेहमीच चर्चा होत असते. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांची स्टाईल, त्यांची फॅशन याविषयी आकर्षण असल्याने आपण त्यांना आपल्याला जमेल तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हेच बघा ना अनुष्का शर्माचा फिटनेस आणि सौंदर्य हा बहुसंख्य तरुणींसाठी एक आकर्षणाचा विषय आहे. अनेक जणींना तिच्यासारखी फिगर हवी असते तर बऱ्याच जणींना तिच्यासारखी फ्लॉलेस स्किन आपलीही असावी असं वाटत असतं. तिच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं सिक्रेट तिने काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत सांगितलं हाेतं (Anushka Sharma Shared Her Fitness And Beauty Secret). त्या मुलाखतीचा तो छोटासा भाग सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.(Anushka Sharma shared surprising facts about her dinner)
अनुष्का शर्माचं फिटनेस सिक्रेटdr.pal.manickam या इन्स्टाग्राम पेजवरून अनुष्का शर्माच्या मुलाखतीचा काही भाग व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये अनुष्का सांगते की ती तिचं रात्रीचं जेवण ५: ३० ते ६ या दरम्यान घेते. ही वेळ सर्वसाधारणपणे आपल्यासाठी चहा आणि स्नॅक्स घेण्याची असते, त्यावेळी मात्र तिचं रात्रीचं जेवण उरकलेलं असतं.
हातापायांवर लाल- काळे दाणे दिसतात, चिकन स्किनचा त्रास? १ सोपा उपाय, स्किन स्पेशालिस्टचाही घ्या सल्ला
ती म्हणते की जेव्हापासून तिने रात्रीच्या जेवणाचा वेळ असा संध्याकाळचा केला आहे, तेव्हापासून तिच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर झाल्या असून तिला झोपही खूप चांगली आणि शांत येते. शिवाय रोज सकाळी अगदी फ्रेश जाग येते आणि कितीही काम असलं तरी दिवसभर खूप एनर्जेटिक वाटतं.
अनुष्का ज्या वेळेला जेवते ती वेळ रात्रीच्या जेवणासाठी पाळणं सर्वसामान्य लोकांसाठी खरोखरच अवघड आहे. कारण यावेळी बहुतांश लोक ऑफिसमध्येच असतात.
पण यावरून आपण एक गोष्ट मात्र नक्की करू शकतो की आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर रात्रीचं जेवण करणं. रात्रीच्या जेवणाला खूप उशीर झालाच तर त्यादिवशी काही हलका आहार घ्यावा. यामुळे फिटनेस तर वाढतोच पण वेटलॉससाठीही मदत होते. शिवाय झोपेच्या आणि आरोग्याच्याही अनेक तक्रारी दूर होतात.