Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट-कंबर इतके सुटले की बेढब दिसता? ५ गोल्डन रुल्स, व्यायाम-डाएट न करताही व्हा बारीक

पोट-कंबर इतके सुटले की बेढब दिसता? ५ गोल्डन रुल्स, व्यायाम-डाएट न करताही व्हा बारीक

Five Golden Rules to lose Bell Fat (Pot kami karnyache upay in marathi) : पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी तुम्ही ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:28 PM2023-11-24T15:28:47+5:302023-11-24T15:44:24+5:30

Five Golden Rules to lose Bell Fat (Pot kami karnyache upay in marathi) : पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी तुम्ही ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल.

Five Golden Rules to lose Bell Fat : How to Lose Belly Fat Quickly Without Exercise | पोट-कंबर इतके सुटले की बेढब दिसता? ५ गोल्डन रुल्स, व्यायाम-डाएट न करताही व्हा बारीक

पोट-कंबर इतके सुटले की बेढब दिसता? ५ गोल्डन रुल्स, व्यायाम-डाएट न करताही व्हा बारीक

वजन कमी करणं खासकरून पोटाची चरबी कमी करणं आजकालची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. (pot kami karnyache upay in marathi) लठ्ठपणामुळे फक्त सौंदर्यंच कमी होत नाही तर डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट डिसिज यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात तर काहीजण डायटिंग करतात. (How to Lose Belly Fat Quickly Without Exercise)

तर काहींना जिममध्ये तासनतास घाम गाळावा लागतो. याव्यतिरिक्त बाजारात मिळणारे काही प्रोडक्टस तुमची मदत करू शकतात. पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी तुम्ही ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल. पोटाची चरबीही वेगाने कमी होईल. हे ५ गोल्डन रुल्स कोणते आहेत ते पाहूया.  डॉक्टर रमिता कौर यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Five Golden Rules to lose Bell Fat)

१) मिड नाईट स्नॅकिंग करू नका

दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्हाला मिड नाईट स्नॅकिेग करण्याची इच्छछा होत असेल तर यामुळे एस्क्ट्रा कॅलरीज जमा होतील. याशिवाय मेटाबॉलिझ्म  स्लो होईल. अशात तुम्ही रात्री जे काही खाल  त्याचे फॅट्समध्ये रूपांतर होईल. तर तुम्हाला फॅट स्टोरेज कमी करायचे असेल  तर बॉडी क्लॉक आणि नॅच्युरल सर्केडियन रिदमनुसार अन्न खा.  याव्यतिरिक्त  लवकर जेवल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहतं. 

२)  कार्ब्स खाण्यावर नियंत्रण ठेवा

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कार्ब्सेच सेवन करू नका. कार्ब्सचे डाएट फॉलो करणं गरजेचं नसते. तुम्ही फळांचे ज्यूस, कुकीज आणि जंक फूड यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. कॉम्पलेक्स कार्ब्स सारख्या भाज्या, बीन्स, शेंगा, यांसराख्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

३) व्यायाम करा

वजन कमी करण्याबरोबरच पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं असतं. वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ चे कॉम्बिनेशन केल्यास तुम्हाला फायदेच फायदे मिळतील. कार्डिओ व्यायाम केल्याने स्टॅमिना आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो, यात रनिंग,  स्किपिंग, जंपिंक जॅक, सायकलिंग यांसारख्या व्यायामांचा समावेश आहे. याशिवाय वेट ट्रेनिंगचाही आपल्या रोजच्या रुटीनमध्ये समावेश करा. कारण वजन कमी झाल्यानंतर त्वचा लटकल्यासारखी दिसू लागते. आपल्या रुटीनमध्ये वेट ट्रेनिंगसाठी समावेश करून तुम्ही मसल्स टाईट आणि टोन्ड बनवू शकता. 

थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नाही? १ ट्रिक, पीठ फुगेल मस्त, करा हलक्या पांढऱ्याशुभ्र इडल्या

४) प्रोटीन्सयुक्त डाएट घ्या

वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.  तुमच्या ताटात प्रोटीन्सयुक्त पदार्थ असतील तर तुम्हाला सतत बाहेरचे पदार्थ खाण्याच्या क्रेव्हिग्ंस होणार नाहीत.  ज्या लोकांना योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यांना सॅटिस्फाईड वाटते.

१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा

५) रात्री भरपर झोप घ्या

रात्री पुरेपूर चांगली झोप घेतल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.  तर ५ तासांपेक्षा कमी झोपल्याने पोटाची चरबी वाढते इंसुलिन रेजिस्टेंटस वाढते म्हणून रात्री कमीत कमी ७ तास झोपायला हवं.

Web Title: Five Golden Rules to lose Bell Fat : How to Lose Belly Fat Quickly Without Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.