Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट झटपट कमी करायचंय? ५ हलके फुलके पदार्थ कितीही खा, १ किलोही वजन वाढणार नाही

पोट झटपट कमी करायचंय? ५ हलके फुलके पदार्थ कितीही खा, १ किलोही वजन वाढणार नाही

Five Indian Snacks to lose Weight (Vajan Kami karnyasathi kay khave) : मधल्यावेळेत खाण्यासाठी योग्य पदार्थांची निवड केल्यास शरीर फिट राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:42 PM2023-11-01T14:42:40+5:302023-11-01T16:42:15+5:30

Five Indian Snacks to lose Weight (Vajan Kami karnyasathi kay khave) : मधल्यावेळेत खाण्यासाठी योग्य पदार्थांची निवड केल्यास शरीर फिट राहील.

Five Indian Snacks to lose Weight : List of Indian Snacks For Weight Loss | पोट झटपट कमी करायचंय? ५ हलके फुलके पदार्थ कितीही खा, १ किलोही वजन वाढणार नाही

पोट झटपट कमी करायचंय? ५ हलके फुलके पदार्थ कितीही खा, १ किलोही वजन वाढणार नाही

दिवसभरात आपण 2 ते 3 वेळा जेवतो. (Weight Loss Tips) सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचे जेवण. याव्यतिरिक्त मध्ये मध्ये स्नॅक्स  किंवा मिड डे मिल खातो. आपण दोन जेवणाच्यामध्ये जे काही खातो त्याचा शरीरावर सर्वाधिक परिणाम होतो. (Healthy Indian snacks for effective weight loss) जर तुम्ही मधल्यावेळेत समोसे, केल्स, पेस्ट्री, चॉकलेट्, बिस्किट्स, तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खात असाल तर वजन वाढण्याची शक्यता असते. (Top 5 Healthy Indian Snacks for Weight Loss) मधल्यावेळेत खाण्यासाठी योग्य पदार्थांची निवड केल्यास शरीर फिट राहील. वजन कमी करण्यासाठी भारतीय स्नॅक्सचा आहारात समावेश करा. (Five Indian Snacks to lose Weight)

मखाने

मखाने सगळ्यात हेल्दी स्नॅक्सपैकी एक आहे. मखाने अमिनो एसिड्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. मखाने खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. काळी मिरी किंवा मसाले घालून तुम्ही मखाने भाजून खाऊ शकता.

प्रोटीन्स, व्हिटामीन्सनी खच्चून भरलेत १० वेगन पदार्थ; रस्त्यावर मिळेल २० रूपयांना वाटा-रोज खा

भेळ

स्नॅक्समध्ये खाण्यासाठी भेळ हा उत्तम पर्याय आहे. कुरमुऱ्यांमध्ये तुम्ही टोमॅटो, कांदा, लिंबू, शेंगदाणे घालूनही खाऊ शकता. भेळपुरी बनवायला सोपी आणि चवीलाही चांगली असते. लो कॅलरीज असल्यामुळे भेळपुरी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.

मोड आलेल्या कडधान्य

मोड आलेली कडधान्य किंवा स्प्राऊट चाट स्नॅक्स एक चांगला नाश्त्यासाठी किंवा जेवताना सॅलेड म्हणून खाण्यासााठी ऑपश्न आहे. कडधान्य खाल्ल्याने बराचवेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि थकवाही येत नाही. याशिवाय पचनक्रियाची चांगली राहते. 

सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात...

ढोकळा

फायबर्स आणि प्रोटीन्सनी परिपर्ण ढोकळा खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. (Weight Loss Diet) सकाळच्या नाश्त्यात ढोकळ्याचा समावेश केल्यास पोट गच्च भरल्यासारखंही वाटत नाही वजन नियंत्रणात राहतं. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. 

मक्का

मक्का भाजलेला किंवा शिजवलेला मक्का खायला फारच छान लागतात. तुम्ही स्नॅक्सच्या स्वरूपात किंवा सॅलेडमध्येही मक्का खाऊ शकता. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असततात.  ज्यामुळे वजन  कमी करण्यास मदत होते.  मक्याची भाकरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. 

Web Title: Five Indian Snacks to lose Weight : List of Indian Snacks For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.