सध्याच्या जीवनशैलीत अनेकांना हाय कोलेस्टेरॉलशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. (High Cholesterol) कारण तेलकट पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलंय. रोजच्या आहारातल्या अनेक पदार्थांमुळे शरीरात घातक कोलेस्टेरॉल जमा होतं. डायबिटीस, हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार यामुळे होऊ शकता. यापासून बचाव करण्यासाठी योग्य कुकिंग ऑईलचा वापर करणं गरजेचं आहे. (Flaxseed oil for high cholesterol lowering diet how it helps in decrease fat from arteries heart attack)
जास्त तेलकट पदार्थांचे अतिसेवन केलं तर खराब कोलेस्ट्रॉल वाढते. जेव्हा जास्त चरबी जमा होते, तेव्हा ती रक्तातील इतर पदार्थांमध्ये मिसळून रक्तवाहिन्यांना चिकटून प्लेक्स तयार करतात. जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल जमा होते, तेव्हा नसा ब्लॉक होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यात समस्या निर्माण होतात. जेव्हा रक्ताभिसरणावर ताण येतो तेव्हा उच्च रक्तदाबाची तक्रार असते.
जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा होते, तेव्हा नसा ब्लॉक होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यात समस्या निर्माण होतात. जेव्हा रक्ताभिसरणावर ताण येतो तेव्हा उच्च रक्तदाबाची तक्रार उद्भवते.
प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी एका हिंदी वेबसाईटला सांगितले की, ''आळशीच्या बियांचे तेल म्हणजेच फ्लेक्स सिड्स ऑईल अशा लोकांसाठी गुणकारी आहे ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा सामना करावा लागतोय. हे तेल सॅलेडवरूनही खाल्लं जाऊ शकतं. याशिवाय हलकं गरम करूनही खाऊ शकता.''
आळशीच्या बिया फॅटी एसिड्स समृद्ध असतात. त्यात ओलेइक अॅसिड, लिनोलेइक अॅसिड आणि अल्फा-लिनोलेनिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे तेल खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. म्हणूनच जवसाच्या बियापासून तयार केलेले तेल जेवणात जास्त वापरण्याचा सल्ला दिला जातो.