Join us  

वजन वाढलंय? बेली फॅट काही केल्या कमी होत नाही? ६ गोल्डन रुल्स, वजन घटेल, दिसाल सुडौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2023 3:04 PM

Follow these 6 golden rules to reduce belly fat वजन कमी करताना ६ सोपे गोल्डन रुल्स फॉलो करा, वजन नक्की कमी होईल..

प्रमाणापेक्षा वजन वाढलं की लोकं, ''किती वजन वाढलंय? वजन कमी कर खूप छान दिसशील'' असे म्हणतात. वजन कमी करताना काहींचे हात - पाय सडपातळ पण पोट सुटते. शरीरातील इतर अवयवांची चरबी देखील कमी होते. पण पोटावरची चरबी ही लवकर कमी होत नाही.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक मार्ग निवडतो. जिम, योगा, डाएट यासह हे ६ गोल्डन रुल्स फॉलो करून पाहा. वजन कमी करताना ६ गोल्डन रुल्स फॉलो केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल, व बेली फॅट देखील झरझर घटेल. हे ६ गोल्डन रुल्स वेट लॉस डाएट टिप्स या इन्स्टाग्राम या अकांऊटवर शेअर करण्यात आलं आहे(Follow these 6 golden rules to reduce belly fat).

बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा ६ गोल्डन रूल्स

डायट प्लॅन

काही लोकं दिवसातून तीन ते चार वेळा जेवतात. ज्यात ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांचा समावेश आहे. मात्र एक्स्पर्टच्या मते, दिवसभरात ३ वेळा भरपेट जेवणापेक्षा ५ ते ६ वेळा छोट्या - छोट्या मिलचे सेवन करा. या उपायामुळे बेली फॅट कमी होईल, व वारंवार भूक देखील लागणार नाही.

जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय

३० मिनिटांचा वर्कआउट

आहारासह वर्कआउट देखील महत्वाचं आहे. नियमित ३० मिनिटे व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. म्हणून दररोज एब्स किंवा हेवी वर्कआउट करा.

जेवणाअगोदार प्या पाणी

काही लोकं जेवणाच्यामध्ये पाणी पितात. ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. एक्स्पर्टच्या मते, जेवणाअगोदर ३० मिनिटे आधी व जेवणाच्या ३० मिनिटानंतर एक ग्लास पाणी प्या. पचनाच्यावेळी पोटात असलेले अॅसिड जेवण पचवण्यासाठी मदत करतात. पण जर आपण जेवताना पाणी पीत असाल तर, जेवण नीट पचत नाही.

वजन वाढतं, पोट सुटतं कारण तुम्ही चुकीच्या वेळी नाश्ता-जेवण करता, मग योग्य वेळ कोणती?

खा प्रोटीन - रिच फूड

प्रोटीन रिच पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही. या प्रोटीन रिच पदार्थांमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ज्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढते. याने वेट लॉस होते. नाश्त्यामध्ये आपण मुगाच्या डाळीचे पदार्थ खाऊ शकता. शक्यतो जंक फूड खाणे टाळा.

झोप व्यवस्थित न घेणे

जर आपल्या शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर, वजन वाढू शकते. जर आपल्याला रात्रीची झोप येत नसेल तर, चिमुटभर दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने रात्रीची झोप चांगली लागेल. व पुरेशी झोप घेतल्याने पोटावरची चरबीही कमी होईल. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स