पावसाच्या दिवसात उष्णतेपासून आराम मिळतो अशावेळी आपण कम्फर्ट झोनमध्ये येतो. या हंगामात काही चटपटीत खायला मिळालं तर मजाच वेगळी असते. (Do not eat these food combinations during monsoons) पण या वातावरणात काही फूड कॉम्बिनेशन्स ट्राय केले तर अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे डायजेस्टिव्ह प्रोब्लेम्स जसं की पोट फुगणं, अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कोणते फूड कॉम्बिनेशन्स पावसाळ्यात नुकसानकारक ठरतात समजून घेऊया. (Food combination to avoid in rainy season)
डेअरी उत्पादनांसह आंबट फळं खाणं
पावसाळ्यात दूध, दही, पनीर यांसारखी डेअरी उत्पादनं संत्री, मोसंबी, द्राक्ष यांसारख्या आंबट फळांसह खाऊ नये. यामुळे पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. आंबट फळांमधील एसिड पोटात जमा झाल्यानंतर अपचनच होऊ शकतं. अशात जर तुम्हाला आंबट फळं खायची असतील तर डेअरी उत्पादनांसह न खाता असेच खा.
स्टार्चयुक्त पदार्थ
रेड मीट, चिकन मांस, ब्रेड, बटाटे यांसारखे स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्यानं पचनक्रिया संथ होते. प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सच्या कॉम्बिनेशन्सना वेगवेगळ्या पचन एंजाइम्सची गरज असते. यामुळे पचनतंत्रावर दबाव येतो. म्हणूनच या प्रकारचे फूड कॉम्बिनेशन्स खाणं करणं टाळा.
जेवताना फळं खाणं
जेवण केल्यानंतर लगेचच फळं खाणं टाळायला हवं. यामुळे तुमच्या पोटात फर्मेंटेशन होऊ शकते. फळं लवकर पचतात. जेव्हा ते खाद्यपदार्थांसह मिसळतात तेव्हा सूज आणि गॅसचं कारण ठरू शकतात.
जेवणासह कोल्ड ड्रिंक्स
जेवताना कोल्ड ड्रिंक्स, कार्बोनेटेड ड्रिंक्स सारख्या पदार्थांचे सेवन टाळा. असे पदार्थ पचनात बाधा आणू शकतात. थंड तापमान रक्त वाहिन्या संकुचित करते. यामुळे पचनक्रिया संथ होते.
फ्राईड आणि तिखट पदार्थ
पावसाळ्यात पचनक्रीया संथ झालेली असते. अशात जर तुम्ही मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ले तर पचनक्रियेवर ताण येतो. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. म्हणूनच हलकं जेवण खायला हवं आणि सौम्य मसाल्यांचा आहारात समावेश करावा.
कॅफेन आणि डेअरी उत्पादनं
डेअरी उत्पादनांमध्ये कॉफी, चहा सारखे कॅफेनयुक्त पदार्थ मिसळ्यानं एसिड रिफेलक्स आणि पचनासंबंधी समस्या उद्भवतात. कॅफेन पोटातील एसिडच्या उत्पादनाला उत्तेजित करते. डेअरी उत्पादनांसह हे मिसळल्यानं त्रास वाढू शकतो.